Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक

Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक

56
Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Nagpur Violance : नागपूरचा हिंसाचार पूर्वनियोजित ! मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक

नागपूरच्या (Nagpur Violance) महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात झालेल्या हिंसाचाराबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या संदर्भात, पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. ही दंगल नियोजनबद्द असल्याचे समोर आले आहे. (Nagpur Violance)

हेही वाचा-Rupee Vs Dollar : भारतीय रुपयाची गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; आठवडाभरात १.२ टक्क्यांची वाढ

सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हिंसाचाराचा कट रचल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हमीद इंजिनिअर हा हिंसाचाराच्या दिवशी सकाळी समाजात भीती पसरवत असल्याचे यात दिसून आले आहे. तो लोकांना मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याची विंनती करत होता. त्यात त्यानं गाझा देणगीची मागणी केली, हे सायबर तपासात पुढे आले आहे. (Nagpur Violance)

हेही वाचा- Spicejet in Jeopardy : स्पाईसजेट कंपनी पुन्हा आर्थिक संकटात; कायदेशीर लढायांमुळे परिस्थिती बिकट

नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराच्या आधी आणि नंतर सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करत आहे. अशी अनेक सोशल मिडिया खाती आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाईही केली जात आहे. अशातच ही मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (Nagpur Violance)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.