विधानसभेत सगळे खोके भाई; Raj Thackeray यांचा घणाघाती हल्ला

मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी आगामी स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली आहे.

118
एका खोक्या भाईचे काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाई भरलेत, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घणाघाती हल्ला केला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने ते देखील विरोधकांच्या निशाण्यावर होते. याअनुषंगाने राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी ही टीका केली आहे.
मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी आगामी स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांनाही ठाकरेंनी (Raj Thackeray) संबोधित केले. याप्रसंगी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. ठाकरे म्हणाले, राज्यातील मूळ विषय सोडून बाकीच्या विषयात सर्वसामान्यांना भरकटून टाकले आहे. यावेळी ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभेतील आमदारांवर देखील खोके भाई म्हणत खोचक टीका केली. तर मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने पक्षरचनेत फेरबदल केले आहेत. मनसेने आता पहिले पाऊल टाकले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज मनसेची अतिमहत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षात नव्या पदांची स्थापना करत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.