-
हिंदुस्थान पोस्ट ब्युरो
हिंदू खाटिकांचा परंपरागत व्यवसाय बंद पडणे, ही ‘हलाल’मुळे उद्भवलेली सामाजिक समस्या आहे. हिंदू धर्मातील विविध जातींना त्यांच्या परंपरागत कौशल्यानुसार उपजीविका करण्याचे साधन उपलब्ध आहे. त्यानुसार हिंदू धर्मातील खाटिक समाज मांसाचा व्यापार करून स्वतःचा आणि परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. सध्या मुसलमानांच्या ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या आग्रहामुळे शासकीय आणि विदेशी आस्थापने, तसेच खाजगी व्यावसायिक केवळ इस्लामी पद्धतीच्या ‘हलाल’ (Halal) मांसाची मागणी करतात. हिंदू खाटिक समाजाच्या विक्रेत्याकडील मांस ‘हराम’ मानले जात असल्याने साहजिकच ते नाकारले जाते. त्यामुळे हिंदू खाटिक समाजाचा वंशपरंपरागत व्यवसाय बंद पडून तो आपोआपच मुसलमानांच्या ताब्यात जाऊ लागला आहे. केवळ डुकराचे मांस मुसलमानांना ‘हराम’ असल्याने ते वगळता अन्य सर्व प्रकारच्या मांसाचा व्यापार अल्पसंख्य मुसलमान समुदायाकडे जात आहे. परिणामी मुळातच मागास असणारा हिंदू खाटिक समाज निरुद्योगी (बेरोजगार) होऊ लागला आहे.
(हेही वाचा – Hindu अल्पवयीन मुलीसोबत मोनिश आणि आरिशने केला विनयभंग; तक्रार करणाऱ्या कुटुंबियांनाच आरोपींनी केली मारहाण)
बहुसंख्य हिंदूंना ‘हलाल’ मांस घ्यावे लागणे अल्पसंख्याकांची हुकूमशाही
नसीम निकोलस तालेब या लेबनन-अमेरिका येथील सुप्रसिद्ध लेखकाने ‘अल्पसंख्याकांची हुकूमशाही सर्वाधिक असहिष्णू विजयी होतो’, या लेखात स्पष्टपणे लिहिले आहे की, हेकेखोर लोकांचा अल्पसंख्यांक गट सातत्याने त्याला अनुकूल गोष्टींची मागणी करून तेथील बहुसंख्यांकांना आपल्या इच्छेने वागण्यास भाग पाडतो. आज भारतात ८० टक्के लोक हिंदू आहेत. त्यांतही ५८ टक्के हिंदू मांसाहार करणारे आहेत. या मांसाहारी हिंदूंना ‘हलाल’ (Halal) मांस भक्षण करणे निषिद्ध आहे, हे ठाऊकच नसते. त्यामुळे मांसाहार करताना मांस ‘हलाल’ (Halal) आहे की ‘झटका’ (या संदर्भात पुढे माहिती दिली आहे.), याकडे त्यांचे लक्षही नसते. दुसरीकडे अल्पसंख्य मुसलमान कोणतीही तडजोड करण्यास सिद्ध नसतो. तो ‘मला इस्लामनुसार ‘हलाल’ मांसच हवे’, अशी मागणी करून प्रचंड दबाव निर्माण करतो. त्यामुळे हिंदूंना दुर्लक्षित करून प्रत्येक ठिकाणी ‘हलाल’ मांसच वापरले जाते. या ‘हलाल’ मांसाला हिंदू विरोध करत नाहीत. त्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना इस्लामी शरीयतनुसार ‘हलाल’ मांसच खावे लागते. हे एकप्रकारे ‘मानसिक इस्लामीकरण’च आहे. अशाच मानसिकतेमुळे इजिप्तमधील बहुसंख्य असणारे ‘कॉप्टिक ख्रिस्ती’ आज अल्पसंख्य झाले आहेत.
मांसाहारी हिंदू आणि शीख धर्मियांना ‘हलाल (Halal) अर्थव्यवस्थे’ला विरोध करण्यासाठी ‘झटका मांस (Jhatka Meat) उपलब्ध करा’ असा आग्रह धरावा लागणार आहे. मुसलमानांमध्ये ‘शरीयत’नुसार ‘हलाल’ मांस वैध मानले गेले आहे; मात्र ते हलाल मांस हिंदू आणि शीख यांच्यासाठी निषिद्ध मानले गेले आहे. हिंदू आणि शीख धर्मियांमध्ये ‘झटका’, म्हणजे शस्त्राने एका घावात पशुचे मुंडके वेगळे केलेल्या मांसाला मान्यता आहे. यात पशुच्या मानेवर वेगाने केलेल्या एका धावात पाठीच्या कण्यापासून त्याचे मंडके वेगळे केले जाते. यामुळे प्राण्याला अत्यल्प बेदना होतात. ‘झटिति’ या संस्कृत शब्दाचे अर्थ ‘द्रुतगतीने, तात्काळ, वेगाने’, हे आहेत. ‘झटिति’ या मूळ संस्कृत शब्दापासून ‘झटका’ हा शब्द बनला आहे. शिखांच्या ‘राहत (रहित) मर्यादा’ या आचारसंहितेनुसार शिखांना कुया’ मांस (म्हणजेच इस्लामी पद्धतीचे ‘हलाल’ मांस) वर्ज्य करण्यास सांगितले आहे. (संदर्भ: ‘पंथ प्रमाणित सिख रहित मर्यादा (आचारसंहिता), प्रकाशक : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, श्री अमृतसर जी) त्यामुळे मांसाहारी हिंदू आणि शीख धर्मियांनी प्रत्येक भोजनालयात त्यांच्यासाठी निषिद्ध असणाऱ्या ‘हलाल’ (Halal) मांसाऐवजी ‘झटका’ मांसाची मागणी केल्यास त्यांना ‘हलाल’ मांस भक्षण करावे लागणार नाही आणि त्यातून हिंदू खाटिक समाजबांधवांना व्यवसायासाठी सहाय्य होईल.
(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला अटक)
सामाजिक-वैधानिक भूमिका आणि कृती
एखाद्या आस्थापनाने ‘हलाल’ (Halal) अनिवार्य करणे, हा एक प्रकारे अनुसूचित जातीचा बहिष्कार करण्याचा दंडनीय अपराध असल्याने याविरुद्ध खाटिक समाजाला आवाज उठवावा लागणार आहे. हिंदू धर्मातील खाटिक समाज परंपरेने मांसाशी संबंधित व्यवसाय करतो. हा समाज अनुसूचित जातीच्या श्रेणीमध्ये येतो. भारतातील ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार निवारण) संशोधन अधिनियम, २०१५’ या कायद्यातील प्रावधानात ‘जर एखादी व्यक्ती कोणत्याही अनुसूचित जाती / जमातीच्या सदस्याशी व्यापार करणे नाकारत असेल, तर त्याला आर्थिक बहिष्कार समजण्यात येईल, असा उल्लेख आहे. यापुढे जाऊन या कायद्यात म्हटले आहे, ‘कोणत्याही अनुसूचित जाती/जमातीच्या सदस्याला कामावर ठेवण्यास नकार देणे, तसेच त्याला सेवा प्रदान करू न देणे’, हाही कायद्याने अपराध आहे. इस्लामनुसार ‘हलाल’ पशुहत्या केवळ मुसलमानच करू शकतात आणि अन्य कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या व्यक्तीने केलेली पशुहत्या ‘हराम’ मानली जाते. त्यामुळे एखाद्या आस्थापनात किंवा भोजनालयात ‘हलाल’ मांस अनिवार्य करणे, हे खाटिक समाजाच्या सदस्यांना कामापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे जेव्हा काही शासकीय विभाग आणि खासगी संस्था ‘हलाल’ (Halal) मांस अनिवार्य करतात, तेव्हा ते ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार निवारण) संशोधन अधिनियम, २०१५’प्रमाणे अनुसूचित जातींचा आर्थिक बहिष्कार करण्याचा दंडनीय अपराध करतात. या दृष्टीने जेथे ‘हलाल’ (Halal) अनिवार्य केले जाते, तेथे खाटिक समाजाने पुढे येऊन त्याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे.
(संदर्भ : भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण हलाल जिहाद?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community