उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh ) बागपत (Baghpat) जिल्ह्यात पोलिसांनी ईदबाबत (Eid al-Fitr) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ईदच्या दिवसांमध्ये कोणालाही रस्त्यावर नमाज अदा करण्यावर पूर्ण बंदी असेल. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी सूचना देण्यात आली आहे.
( हेही वाचा : विधानसभेत सगळे खोके भाई; Raj Thackeray यांचा घणाघाती हल्ला)
पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय (Arpit Vijayvargiya) यांनी दि. २३ मार्चला सांगितले की, अलविदा जुमा आणि ईद-उल-फितर (Eid al-Fitr) शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस सतर्क आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, जिल्ह्यातील ६८ ईदगाह (Eidgah) आणि १९५ मशिदींवर पोलिस तैनात केले जातील. ईदसाठी (Eid al-Fitr) कोणतीही नवीन परंपरा स्वीकारली जाणार नाही. रस्त्यावर नमाज होणार नाही. प्रथा परंपरेव्यतिरिक्त कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शांतता राखण्यासाठी शांतता समितीशी चर्चा करण्यात आली आहे. संवेदनशील भागात ड्रोन कॅमेरे आणि पोलिसांकडून गस्त घालून लक्ष ठेवले जाईल. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिस स्टेशन प्रभारी आणि चौकी प्रभारी यांची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान मेरठ रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक कलानिधी नैथानी (Kalanidhi Naithani) यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना अलविदा जुमा आणि ईद-उल-फितर (Eid al-Fitr) सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community