Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात; दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू

97
Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात; दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू
Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात; दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शिवपुरी (Shivpuri) जिल्ह्यात फोरलेन हायवेवर (Four-lane highway) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अर्टिगा कार पलटून कारमधील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार अन्य डॉक्टर जखमी झाले आहेत. हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी लुकवासा पोलीस ठाणे क्षेत्रात शिवपुरी-गुना हायवेवर त्यांची कार अनियंत्रित झाली, यामुळे ती पलटी मारत पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दोन महिला डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा : Sambhal Violence प्रकरणी जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक)  

यावेळी डॉ. अतुल आचार्य (Dr. Atul Acharya) हे कार चालवत होते. कवासा बायपासवर (Kawasa Bypass) त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याकडून अपघातग्रस्तांना मदत पुरवण्यात आली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अतुल आचार्य हे भिवंडीचे असल्याचे सांगितले जात आहेत. दि.२३ मार्चला सकाळी आठ वाजता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Madhya Pradesh)

जखमींमध्ये डॉ. उदय जोशी (६४) रा. दादर, डॉ. सुबोध पंडित (६२) रा. वसई, डॉ. अतुल आचार्य (Dr. Atul Acharya) (५५) रा. भिवंडी आणि डॉ. सीमा जोशी (५९) यांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये अतुल आचार्य यांची पत्नी डॉ. तन्वी आचार्य (Dr. Tanvi Acharya) (५०) व सुबोध पंडित यांची पत्नी डॉ. नीलम पंडित (Dr. Neelam Pandit) (५५) यांचा मृत्यू झाला आहे. नीलम यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला तर तन्वी (Dr. Tanvi Acharya) यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. (Madhya Pradesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.