Mosque : मुंबई येथे बैठ्या चाळीत ३ घरे एकत्र करून उभारली अनधिकृत मशीद

संबंधित अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम एका महिन्याच्या आत पाडण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी सरकारच्या वतीने दिले.

141

मुंबई येथील चारकोपच्या सेक्टर १, प्लॉट क्रमांक १४५ वर ‘नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्था’ ही म्हाडाची निवासी वास्तू आहे. येथील बैठ्या चाळीत ३ घरे एकत्र करून त्यांचे बेकायदेशीर मशिदीत (Mosque) रूपांतर करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हालचाली चालू आहे, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधित अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम एका महिन्याच्या आत पाडण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी सरकारच्या वतीने दिले.

महापालिका, म्हाडा, पोलीस यांचे दुर्लक्ष 

आमदार योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा गंभीर प्रकार विधानसभेत मांडला. ते म्हणाले, ‘‘चारकोप येथील या वास्तूमधील खोली क्रमांक १४ ते १६ मध्ये खोली मालकाकडून अनधिकृतरित्या मशीद (Mosque) चालू करण्यात आली आहे. या खोलीमालकांनी धार्मिक स्थळ चालू करण्याविषयी गृहनिर्माण संस्था, महापालिका अथवा म्हाडा यांच्याकडून कोणतीही रितसर अनुमती घेतलेली नाही. सद्यःस्थितीत या संस्थेतील ३० पैकी २७ घरांमध्ये हिंदु कुटुंबे रहातात. मशिदीमुळे (Mosque) मुसलमान समाजाच्या व्यक्तींची या वास्तूत सातत्याने वर्दळ असते. स्थानिक हिंदु रहिवाशांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी संबंधितांनी मुंबई महापालिका, स्थानिक पोलीस, म्हाडा आणि लोकप्रितनिधी यांच्याकडे केल्या आहेत. ही गोष्ट अतिशय गंभीर असून या परिसरात नाहक जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीची तातडीने चौकशी करून कारवाई करावी. गृहनिर्माण संस्थेतून मशीद (Mosque) तात्काळ हटवण्यात यावी’, अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी केली.

(हेही वाचा घुसखोर १३ बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात पुन्हा पाठवले; Assam Government चे सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र )

त्यावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, संबंधित गृहनिर्माण संस्थेत ३५ बैठ्या खोल्या आहेत. त्यातील १४, १५ आणि १६ क्रमांकाच्या खोल्या ‘विशिष्ट समाजा’च्या आहेत. स्थळ पहाणी केल्यानंतर या खोल्या एकत्र करून अनधिकृत प्रार्थनास्थळ (Mosque) उभारण्यात आले आहे. १८ मार्च या दिवशी संबंधितांना नोटीस पाठवून याविषयाची सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र त्यास कुणीही उपस्थित राहिले नाही किंवा लेखी म्हणणे मांडले नाही. सकृतदर्शनी हे धार्मिक स्थळ (Mosque) अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने एका महिन्याच्या आत हे अतिक्रमण पाडण्यात येईल.‘एम्.आर्.टी.पी’चा गुन्हा नोंद करण्याविषयी म्हाडाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांना सूचना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.