-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी यंदाचा पहिलाच सामना कामगिरीचं मिश्र फळ देणारा ठरला. हा सामना त्याचा आयपीएलमधील २५८ वा सामना होता. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच त्याच्या नावावर एक विक्रम जमा झाला. तो मुंबईसाठी फलंदाजीला उतरला, तो त्याचा २५८ वा आयपीएल डाव होता. त्याने दिनेश कार्तिक (२५७) मागे टाकलं. आता त्याच्या पुढे फक्त महेंद्र सिंग धोनी आहे. धोनी २६५ आयपीएल डाव खेळला आहे. पण, त्याचवेळी रोहितच्या नावावर एक नकोसा विक्रमही लागला. रोहित सामन्याच्या पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला आणि ही वेळ त्याच्यावर आयपीएलमध्ये अठराव्यांदा आली. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक भोपळ्यांच्या यादीतही रोहित आता अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. इथं त्याच्याबरोबर दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलही आहेत. (IPL 2025)
रोहित गेल्यावर्षी जून महिन्यात खेळलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आपला पहिला टी-२० सामना रविवारी खेळला. खलिल अहमदच्या चेंडूवर शिवम दुबेकडे झेल देऊन तो बाद झाला. (IPL 2025)
(हेही वाचा – Israel च्या हवाई हल्ल्यात पत्नीसह हमासचा सर्वोच्च नेता बर्दावील ठार)
How’s that for a start #CSK fans? 💛
Khaleel Ahmed strikes twice in the powerplay with huge wickets of Rohit Sharma and Ryan Rickelton 💪
Updates ▶️ https://t.co/QlMj4G6N5s#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/jlAqdehRCq
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
रोहितने अलगद पूल केलेला हा फटका थेट शिवम दुबेच्या हातात गेला. (IPL 2025)
आयपीएलमधील सर्वाधिक भोपळे :
- रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) – १८
- दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – १८
- ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – १८
- पियुष चावला (मुंबई इंडियन्स) – १६
- सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स) – १६
त्याचवेळी रोहितचा हा २५८ वा डाव होता आणि २००८ पासून ही लीग खेळत असलेल्या रोहितने २९.२७ धावांच्या सरासरीने ६,६२८ धावा जमवल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतकं आणि १०० झेलही आहेत. गेल्या हंगामापासून मुंबई इंडियन्स संघ प्रशासनाने त्याच्याकडूव नेतृत्व काढून घेत ते युवा हार्दिक पांड्याकडे दिलं आहे. नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी फ्रँचाईजीने हा निर्णय घेतला आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community