NEET (PG) ही अशी एक प्रवेश परीक्षा आहे, जी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळ म्हणजेच NBEMS द्वारे घेतली जाते. ही परीक्षा सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांकरीता पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. जसं की, डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच MD, मास्टर ऑफ सर्जरी म्हणजेच MS, पीजी डिप्लोमा, डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड म्हणजेच DNB, डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड म्हणजेच DrNB आणि NBEMS डिप्लोमा इत्यादी. ही परीक्षा ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एन्ट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच AIPGMEE ची जागा घेते. समुपदेशन आणि जागा वाटप हे आरोग्य सेवा महासंचालनालय म्हणजेच DGHS यांच्याद्वारे केलं जातं. (neet pg 2025 exam date)
राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने म्हणजेच NBEMS ने हे अधिकृतपणे जाहीर केलं आहे की, NEET PG २०२५ ही राष्ट्रीय पात्रता सह-प्रवेश परीक्षा १५ जून २०२५ या दिवशी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यासंबंधीचा संपूर्ण तपशील आणि इतर परीक्षेशी संबंधित असलेली माहिती योग्य वेळी NBEMS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (neet pg 2025 exam date)
(हेही वाचा – वादग्रस्त samay raina ला कोण नाही ओळखत; तो किती पैसे कमावतो?)
NBEMS ने त्या सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की, “राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळ (NBEMS) NEET-PG २०२५, १५ जून २०२५ या दिवशी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर दोन शिफ्टमध्ये आयोजित करेल.” तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे परीक्षा घेण्याच्या निवडीमुळे ऑनलाइन वादविवाद सुरू झाला आहे. X सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर असंख्य अर्जदार, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कार्यकर्त्यांनी सामान्यीकरण प्रक्रिया आणि चाचणीच्या निष्पक्षतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (neet pg 2025 exam date)
एका डॉक्टरने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून असं म्हटलं आहे की, “२०२४ साली #सामान्यीकरण गोंधळ असूनही NBEMS ने दोन शिफ्टमध्ये #NEETPG २०२५ ची घोषणा केली आहे! यामुळे अनुचित स्कोअरिंग, कायदेशीर वाद आणि उमेदवारांची चिंता निर्माण होते -त्याच चुका पुन्हा का करायच्या?” युनायटेड डॉक्टर्स फ्रंट म्हणजेच UDF ने एकाच शिफ्टमध्ये NEET-PG २०२५ साली परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती ट्विटमध्ये केली होती. त्यांनी तसं गृहमंत्री जे.पी. नड्डा यांना अधिकृतपणे पत्रही लिहिलं आहे. (neet pg 2025 exam date)
(हेही वाचा – Vidyavihar Fire Case: विद्याविहारमध्ये हाऊसिंग सोसायटीला आग, एकाचा मृत्यू)
NEET-PG २०२५ परीक्षेची माहिती आणि महत्त्वाच्या तारखा (तात्पुरत्या तारखा)
- परीक्षेची तारीख : १५ जून २०२५
- नोंदणी सुरू होईल – एप्रिल २०२५
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – मे २०२५ चा तिसरा आठवडा
- नीट पीजी प्रवेशपत्र – जून २०२५ चा दुसरा आठवडा
- परीक्षेची पद्धत : संगणक-आधारित चाचणी
- शिफ्ट : दोन शिफ्ट (अचूक वेळ जाहीर केली जाईल)
अर्ज करण्याची पद्धत : nbe.edu.in वर ऑनलाइन. (neet pg 2025 exam date)
(हेही वाचा – india hyperloop project : व्हर्जिन हायपरलूप या नावाने सुरु झालेला प्रख्यात प्रकल्प बंद का पडला?)
NEET-PG २०२५ अर्ज शुल्क
- सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस : ₹३,५००
- एससी, एसटी, अपंग : ₹२,५००.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community