रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा; Chhatrapati Sambhaji Raje यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

209
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा; Chhatrapati Sambhaji Raje यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा; Chhatrapati Sambhaji Raje यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी खासदार संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी रायगड (Raigad) किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात संभाजी राजे यांनी लिहले की, ” वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी” अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. त्यातच भारतीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Survey of India) धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिकाही संभाजी राजे यांनी मांडली.

( हेही वाचा : आता माफी मागा, अन्यथा तोंडाला काळं फासू; गुलाबराव पाटलांचा कुणाल कामराला इशारा | Gulabrao Patil

संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पत्रात पुढे लिहले की, “हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड (Raigad) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा (Waghya ) नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.” (Chhatrapati Shivaji Maharaj)

तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान आहे. अशावेळी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली. (Chhatrapati Sambhaji Raje)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.