Indian Basketball Team : बहारीनला हरवून भारतीय बास्केटबॉल संघ आशिया चषकासाठी पात्र

Indian Basketball Team : भारतीय संघाला आता विश्वचषकासाठी पात्र होण्याची संधी आहे.

57
Indian Basketball Team : बहारीनला हरवून भारतीय बास्केटबॉल संघ आशिया चषकासाठी पात्र
  • ऋजुता लुकतुके

भारतीय बास्केटबॉल संघाने बहारीनचा ८१ विरुद्ध ७७ गुणांनी पराभव करत बास्केटबॉलच्या आशिया चषकात आपलं स्थान पक्कं केलं आहे. बहारीनविरुद्धचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पण, शेवटच्या क्षणांवर ताबा ठेवत प्रतिस्पर्धी संघ आपल्या पुढे जाणार नाही, याची पुरेपूर काळजी भारतीय संघाने घेतली. या आधीच्या संघात भारताने इराकचाही पराभव केला होता. या सलग दोन विजयांमुळे आशिया स्तरावर भारतीय संघाची आगेकूच साध्य झाली आहे आणि त्याचबरोबर २०२७ च्या बास्केटबॉल विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आता आपल्याला खेळता येणार आहे. (Indian Basketball Team)

(हेही वाचा – IPL 2025, SRH vs RR : राजस्थानच्या जोफ्रा आर्चरची आयपीएलमधील सर्वात महागडी गोलंदाजी)

अरविंद कृष्णन आणि प्रणव प्रिन्स यांनी मधल्या वेळेत चांगला खेळ करत भारताला आघाडी मिळवून दिली. नाहीतर सुरुवातीला भारतीय संघ १२ गुणांनी पिछाडीवर पडला होता. या सामन्यात एकट्या हर्ष डागरने भारताला २८ गुणांची कमाई करून दिली. ३ गुण मिळवून देणाऱ्या रेषेवरून त्याने तब्बल ६ वेळा अचूक बास्केट साध्य केली. लागोपाठ दोन विजयांमुळे भारतीय संघ आता सौदी अरेबियात जेद्दाह इथं होणाऱ्या आशिया चषकासाठी पात्र ठरला आहे. (Indian Basketball Team)

(हेही वाचा – Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही)

दडपणाखाली चांगला खेळ करत भारतीय संघाने या सामन्यात आधी पिछाडी भरून काढली आणि त्यानंतर मिळवलेली आघाडी शेवटच्या क्षणांमध्ये आपल्याकडे कायम राखली. भारतीय संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक स्कॉट फ्लेमिंग यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. ‘आशियाई स्तरावर भारतीय संघाने सलग तीन विजय मिळवले आहेत आणि त्यातील शेवटचे दोन अनपेक्षित असेच होते. ते पाहता आम्ही चांगलाच खेळ केला हे सिद्ध होतंय. खेळाडूंमध्ये असलेला विजयाचा आत्मविश्वास मनाला उभारी देणार आहे,’ असं फ्लेमिंग यांनी बोलून दाखवलं. (Indian Basketball Team)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.