
-
प्रतिनिधी
धारावीतील नेचरल पार्क या ठिकाणी सिलेंडरने भरलेल्या ट्रकला लागलेल्या आग प्रकरणी (Dharavi Cylinder Blast Case) धारावी पोलिसांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर पार्क असलेल्या वाहन चालक तसेच बेकायदेशीर पार्किंग चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये गॅस सिलेंडर पुरवठादार, मॅनेजर, ट्रक चालक, तसेच इतर ट्रक चालक, शिधावाटप पुरवठादार यांच्यासह बेकायदेशीर पार्किंगची वसुली करणाऱ्याचा समावेश आहे. धारावी येथील नेचरल पार्क जवळ उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग (Dharavi Cylinder Blast Case) लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचे स्फोट होऊ लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाने येथील घरे रिकामे करून स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. (Dharavi Cylinder Blast Case)
(हेही वाचा – Kunal Kamra ला कंगना रणौत यांनी सुनावले; म्हणाले…)
या ठिकाणी ट्रक क्रमांक एम. एच .०४ एफ. जे. १३२० च्या चालक व टेम्पो क्रमांक एम. एच.०१, सि.क्यु ०२५२ च्या चालकाने त्याच्या ट्रकमध्ये स्फोटक ज्वलनशील पदार्थ गॅस भरलेला असतांना देखील त्याने त्याची ट्रक विनापरवाना रस्त्याच्या कडेला डबल पार्किंगमध्ये उभी केली तसेच रेशनची तांदुळ गाडीत भरलेला असतांना देखील मोटार ट्रक क्रमांक एम. एच. ०१, डि. आर. ६६६४ च्या चालकाने व इतर मोटार कार व ट्रक चालकांनीही त्यांचे मालकीचे मोटार वाहन हे येणारे जाणारे लोकांना त्रास होईल अशा रितीने रस्त्याच्या कडेला डबल पार्किंगमध्ये उभे केल्यामुळे त्या ठिकाणी गॅसचा स्फोट (Dharavi Cylinder Blast Case) होऊन मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. (Dharavi Cylinder Blast Case)
(हेही वाचा – कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक Qari Shahzad ची गोळ्या झाडून हत्या)
दरम्यान त्या ठिकाणी हजर असणारे वाहन चालकांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ट्रक क्रमांक एम. एच. ०४ एफ. जे. १३२० या चालकाचे नाव बाबु गोपाल पुजारी (४५) आणि त्याच्या ट्रकमध्ये एच. पी. कंपनीचा गॅस सिलेंडर पुरवठा करणारे मालक निनाद सुरेश केळकर (५०), मॅनेजर नागेश सुभाष नवले, (२८) असे असल्याचे समजले. टेम्पो क्रमांक एम. एच. ०१ सि. क्यु ०२५२ च्या चालकाचे नाव वेलु नाडार असे असल्याचे समजले. तसचे मोटार ट्रक क्रमांक एम. एच. ०१ डि. आर. ६६६४ च्या चालकाचे नाव सोनु गौतम चारमोहन असे असल्याचे व रेशनिंगचा मालक अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता, असे असल्याचे समजले. तसेच सदर ठिकाणी अनाधिकृतपणे कार व टूक चालकांना गाडी पार्कींगसाठी लावण्यास सांगुन त्यांच्याकडून पैसे घेणारे तरबेज तारीक शेख, तारीक जब्बार बार शेख असे असल्याचे समजले. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार असल्याचे माहित असतांना देखील जाणूनबुजून हलगर्जीपणा करून गाडी पार्क करून हयगयीचे वर्तन केल्यामुळे त्या ठिकाणी आग (Dharavi Cylinder Blast Case) लागली त्यामुळे त्यांचे व इतर मोटार कारचे गाडीचे नुकसान केले म्हणून त्या सर्वांविरुद्ध व इतर वाहन चालकांविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dharavi Cylinder Blast Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community