सांगली, सातारा, कोकणात मंगळवारी रात्री उशिरा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, पाली, देवरुख परिसरात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात हा अवकाळी पाऊस झाला आहे. कणकवली येथेही काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार धास्तावला आहे. (Unseasonal Rain)
बागायतदार चिंतेत
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसाने उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी आंबा, काजूसह कोकणी रानमेवाचं मात्र हा अवकाळी पाऊस नुकसान करणार आहे. यंदा आंब्याचं पीक कमी असताना आधीच अडचणीत सापडलेला बागायतदार अवकाळी पावसामुळे मात्र चिंतेत पडला आहे. (Unseasonal Rain)
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. प्रचंड वादळी वाऱ्यासह हा अवकाळी पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं मिरज शहर आणि ग्रामीण भागांमध्ये हजेरी लावली. पावसासोबतच जोरदार वादळ देखील होतं, त्यामुळे रस्त्याच्या कडेची छोटी-मोठी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांसह काही ठिकाणी शहरी भागांचा देखील वीजपुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी तर घरांवरची पत्रे देखील उडून गेले आहेत. (Unseasonal Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community