-
ऋजुता लुकतुके
केटीएम कंपनीने अलीकडेच जगभरात सिंगल सिलिंडर रेंजच्या ड्यूक १२५, ड्यूक २५०, ड्यूक ९० या बाईकचं आधुनिकीकरण केलं आहे. जगभरात कंपनीने अद्ययावत मॉडेल लाँच केली आहेत. आता भारतातही केटीएम १२५ ड्यूक २०२५ (KTM 125 Duke 2025) ही बाईक दाखल होणार आहे. या गाडीत झालेले चार मोठे बदल आता बघूया.
ड्यूक १२५ (KTM 125 Duke 2025) या गाडीच्या स्टायलिंगमध्ये झालेले बदल हे माफक असले तरी ते आधुनिकीकरणाकडे झुकणारे आहेत. गाडीच्या हेडलँपची रचना बदलण्यात आलीय. तिथे आता आधुनिक क्लस्टर आहे. तर नवीन बाईकमध्ये इंधनाच्या टाकीचा क्षमता आणि आकार दोन्ही बदलण्यात आला आहे. आणि तो तरुणांना आवडेल असा करण्यात आलाय.
(हेही वाचा – मुंबईच्या सतीश भिडे यांचे निःस्वार्थ कार्य; Veer Savarkar यांच्यावर सादर केले तीन हजार कार्यक्रम)
तर गाडीची सीटही पूर्णपणे बदलण्यात आली आहे. आताची सीट ही चालक आणि सहप्रवासी अशा दोघांसाठी जास्त आरामदायी असल्याचं बोललं जातंय.
गाडीतील सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो गाडीच्या मध्यभागी असलेला डिस्प्ले. जुन्या ॲनालॉग डिस्प्लेच्या (Analog display) ऐवजी इथं ५ इंचांचा डिजिटल डिस्प्ले (Digital display) आहे. आणि हा डिस्प्ले आता फोनलाही जोडता येणार आहे. त्यामुळे फोनमार्फत तुम्ही गाणी लावू शकता. तसंच नेव्हिगेशनही वापरू शकता.
🔥 KTM to replace 125 Duke/RC 125 with 160cc models in India! Targeting Yamaha’s 155cc dominance. 19-20 HP, premium features, mid-2025 launch. #KTM #MotorcycleNews #IndiaAuto #BikeLaunch #YamahaRival
— Nitin Kumar (@Imnitz2) March 9, 2025
(हेही वाचा – महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आणखी ३७५ Facial Biometric Attendance Machines)
नवीन बाईकची फ्रेम स्टील आणि ॲल्युमिनिअमची आहे. बाईकचे नवीन १७ इंच त्रिज्येची चाकं ही जास्त वजनाने हलकी आहेत. आणि त्यांची रस्त्यावरची पकडची आधीपेक्षा मजबूत आहे. ड्यूक १२५ (KTM 125 Duke 2025) बाईकचं इंजिन तसं जुनंच आहे. पण, त्यातही काही महत्त्वाचे बदल मात्र कंपनीने केले आहेत. या इंजिनाचा एअरबॉक्स मोठा आहे. आणि त्यामुळे इंजिनाची क्षमता ०.५ हॉर्सेस आणि ०.५ एनएमनी वाढली आहे.
याशिवाय या बाईकमध्ये सुपरमोटो एबीएस प्रणालीही बसवण्यात आली आहे. या गाडीची भारतातील किंमत १.४१ लाख रुपये इतकी असेल अशी शक्यता आहे. यामाहाच्या १५५ सीसी इंजिन असलेल्या बाईकशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हे आधुनिकीकरणाचं पाऊल उचललं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community