प्राचीन इतिहासाची अचूक उकल होणार; Mumbai University मध्ये भारतातील पहिली ‘AMS’ सुविधा कार्यान्वित

71
प्राचीन इतिहासाची अचूक उकल होणार; Mumbai University मध्ये भारतातील पहिली 'AMS' सुविधा कार्यान्वित
प्राचीन इतिहासाची अचूक उकल होणार; Mumbai University मध्ये भारतातील पहिली 'AMS' सुविधा कार्यान्वित

Mumbai University : भारतातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा (एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस) मंगळवारपासून मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली असून सुमारे २० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या अद्ययावत सुविधेमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर (Carbon dating chronology facility) सुरू करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः विद्यापीठांमध्ये ही प्रगत सुविधा सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.  (Mumbai University)

(हेही वाचा – Yogesh Kadam यांचे कुणाल कामरा प्रकरणावर मोठे वक्तव्य; कायद्यानुसार कारवाई होणार)

विद्यापीठात कार्यान्वित होत असलेल्या या सुविधेमुळे पुरातत्त्वशास्त्र (Archaeology) आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे केंद्र सज्ज असून ५० हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परिणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या कें द्राकडे आहे. भारतातील अत्यंत प्राचीन संस्कृती आणि मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणुऊर्जेच्या संशोधनात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई विद्यापीठातील या सुविधा फक्त पुरातत्त्वीय समुदायांच्या गरजा पूर्ण करणार नाहीत, तर भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.

(हेही वाचा – PF Withdrawal : गुगल पे, फोन पे सोबतच एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, समोर आली मोठी अपडेट)

हा अत्याधुनिक एक्सलरेटर नेदरलँडमधील एचव्हीईई कंपनीकडून घेण्यात आला आहे. विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील मांजी प्राध्यापक डॉ. डी. सी. कोठारी आणि टीआयएफआरमधील प्रा. एम. एन. वाहिया यांच्या पुढाकारातून या प्रकल्पावर काम केले गेले. सध्या जगात अशा ४५ मशीन कार्यान्वित असून युरोपमध्ये २२, अमेरिकेत ९, जपानमध्ये ८, ऑस्ट्रेलियात ३, न्यूझीलंड-कॅनडा-चीन आणि कोरिया येथे प्रत्येकी १ मशीन आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोग
एखाद्या जीवाचे कालमापन करण्यासाठी बायोमेडिकल संशोधनात (Biomedical Research) रेडिओ कार्बन डेटिंगच्या मदतीने संशोधक एक प्रकारचे घड्याळ म्हणून वापरू शकतात, जे त्यांना भूतकाळात डोकावण्यास आणि लाकडापासून ते अन्न, परागकण, मलमूत्र आणि अगदी मृत प्राणी आणि मानवांपर्यंत सर्व गोष्टींसाठी अचूक कालखंड निर्धारित करण्यास मदत करते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.