व्यावसायिक वाहनांवर मराठीतूनच संदेश; गुढीपाडव्यापासून अंमलबजावणीचे मंत्री Pratap Sarnaik यांचे ‘RTO’ला आदेश

75

Pratap Sarnaik : येत्या गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa 2025) मराठी नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत (RTO) नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर (टेम्पो, ट्रक, बस इ.) लिहिलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी परिवहन विभागाला (RTO) दिले आहेत. (Pratap Sarnaik)

यासंदर्भात मंत्री सरनाईक म्हणाले की, मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक मराठी भाषिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. सहाजिकच मराठी भाषेचे संवर्धन करणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्त्वाच्या जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठीत लिहिण्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

(हेही वाचा – अवैध हुक्का पार्लरचा परवाना रद्द करणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

मराठीचा योग्य सन्मान राखला जाईल राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहिलेली असते. उदा. बेटी बचाओ, बेटी पढाओ. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारावर मर्यादा येतात. यापुढे असे सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेतून लिहिल्यास उदा. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. मराठी भाषेचा योग्य सन्मानही राखला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.