Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढत आहेत. नाशिकमधील मनमाड पोलीस ठाण्यात (Manmad Police Stations) कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, कुणालला मुंबई पोलिसांकडून धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी कामराचे अपील फेटाळले आहे. खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले होते, त्यावर कुणाल कामरा याच्या वकिलांनी एक आठवड्याची वेळ मागितली होती. तसेच खार पोलिसांनी कुणाल कामराची एक आठवड्याची वेळ देण्याची मागणी फेटाळून लावली असून, बुधवारी खार पोलीस कुणाल कामराला बीएनएस कलम ३५ अंतर्गत दुसरे समन्स बजावणार आहे. (Kunal Kamra)
मनमाडमध्ये गुन्हा दाखल
नाशिकमधील मनमाड पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते मयूर बोरसे यांनी कुणाल कामरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुणालविरुद्ध बीएनएसच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला आहे आणि प्रकरण खार पोलिसांकडे वर्ग केले आहे. आता कुणाल कामराविरुद्ध एकूण ३ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कुणाल कामराविरुद्ध तिन्ही पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर नोंदवण्यात आला आहे, जो नंतर खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कामरा विरुद्धचे एफआयआर कुठे आहेत?
- पहिला एफआयआर – खार पोलीस स्टेशन
- दुसरा एफआयआर – डोंबिवली पोलीस स्टेशन
- तिसरा एफआयआर – मनमाड पोलीस स्टेशन(हेही वाचा – Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर)
नेमकं प्रकरण काय ?
कुणाल कामराने मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे सुधारित रूप वापरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (DCM Eknath Shinde) टीका केली होती. या वादानंतर, रविवारी रात्री मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते हॉटेल युनिकॉन्टिनेंटल बाहेर आले आणि त्यांनी क्लब आणि हॉटेलच्या परिसरात तोडफोड केली. मुंबईच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पहाटे कुणाल कामराविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामध्ये कलम ३५३(१)(ब) (सार्वजनिक त्रास देणारी विधाने) आणि कलम ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community