मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) शायरीच्या माध्यमातून विरोधकांचा समाचार घेतला. मंगळवारी (२५ मार्च) मुख्यमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत (Law and order) सभागृहात भाष्य केले. यावेळी फडणवीसांनी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांचाही खरपूस समाचार घेतला. अक्षय शिंदे प्रकरणाबाबत बोलताना फडणवीसांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले. तसेच विरोधक काहीही बोलले तरी आम्ही तिघे एक आहोत असेही फडणवीस म्हणाले. (CM)