गुंतवणुकीवर जास्त परतावा, सरकारी नोकरी मिळवणे किंवा घरी बसून पैसे कमवणे अशा ऑफर्सच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकार दररोज सामान्य होत आहेत. याशिवाय डिजिटल अटक, धमक्या आणि लूटमारीच्या अनेक बातम्या देखील दररोज येत आहेत. यामध्ये काही हजार नाही तर लाखो कोटींची फसवणूक होत आहे. अशी ताजी घटना ठाण्यातील आहे. येथे एका व्यावसायिकाची सुमारे २२ लाख रुपयांची फसवणूक (Thane Fraud of 22 lakhs) झाली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. (Thane Fraud Case)
(हेही वाचा – ‘ती’ नावं तुम्हाला आठवतात का ? ; मुख्यमंत्री फडणवीसांनी आव्हाडांना करून दिली आठवण | CM)
सुमारे ५० वर्षांच्या पीडितेला १० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ही फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पीडितेचा व्यवसाय आणि कर्ज घेण्याचे कारण उघड केलेले नाही. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने गेल्या वर्षी मार्च ते जुलै दरम्यान अंबरनाथ परिसरातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय व्यावसायिकाशी (businessman) संपर्क साधला आणि त्याला मोठ्या किमतीचे कर्ज मिळवून देण्याची ऑफर दिली. प्रक्रिया सुलभ करण्याच्या बहाण्याने, आरोपीने कमिशन फी आणि इतर शुल्क २२.७ लाख रुपयांची मागणी केली. अधिकाऱ्याने सांगितले की पीडितेने पैसेही दिले होते पण नंतर त्यांना कळले की कर्ज प्रक्रियेसाठी दिलेली कागदपत्रे बनावट होती.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Session 2025 : तरुणाचे विधानभवन परिसरातील झाडावर चढून आंदोलन ; क्रेनने झाडावर चढले आमदार अग्रवाल आणि…)
त्या व्यावसायिकाला कर्ज तर मिळालेच नाही पण त्याचे पैसेही परत मिळाले नाहीत. त्याच्या तक्रारीवरून, पोलिसांनी मंगळवारी आरोपीविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही पहा –