
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, २६ मार्च रोजी झाली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची आणखी काही काळ रिकामी राहण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये आतंकवादी हल्ल्यांची शक्यता; बांगलादेशी सैन्यदलप्रमुखांनी सेनादलांना केले सतर्क)
विधानसभेत उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. त्यावेळी सभागृहात डाव्या बाजूला पहिल्या रांगेतील पहिली खुर्ची उपाध्यक्षांची असते. तर, दुसऱ्या खुर्चीवर विरोधी पक्षनेते बसतात. उपाध्यक्षांच्या खुर्चीवर त्या रिकाम्या खुर्चीवर बुधवारी अण्णा बनसोडे विराजमान झाले. आता त्यांच्या शेजारची खुर्ची भरा, विधानसभा अध्यक्षांची निवड करा, अशी विनंतीवजा मागणी विरोधी बाकांवरून होत होती. अन्यथा उपाध्यक्ष बनसोडे यांना एकटे वाटेल, अशी मिश्किल टिप्पणीही झाली. त्यावर, अजून काही काळ त्यांना मोकळे बसू द्या, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवाय, बाजुच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील, तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजुची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या, असे फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बीसीसीआयच्या मध्यवर्ती करारांत परतणार?)
महाविकास आघाडीतील (MVA) तीनही पक्षांचे मिळून विरोधी पक्ष नेता निवडीइतके संख्याबळ नसताना विरोधी पक्ष हा उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community