Kunal Kamra ला वाढीव मुदत देण्यास पोलिसांचा नकार; बजावले दुसरे समन्स

67

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खिल्ली उडवणारे एक गाणे लिहिणारा कुणाल कामरा (Kunal Kamra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाढीव मुदत देण्यास नकार दिला. त्याला दुसरे समन्स बजावण्यात आले आहे. कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावले होते; पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. त्यामुळे आता पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

(हेही वाचा – विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे सूचक विधान; म्हणाले, अजून काही काळ…)

यापू्र्वी मंगळवार, २५ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला पहिले समन्स पाठवले होते; पण तो हजर राहिला नाही. आता एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून आणि त्या गाण्यावरून त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता एक गाणे तयार केले होते, ज्यात त्यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये शो केला, त्या ठिकाणी असलेल्या स्टुडिओचीही (Habitat Studio) तोडफोड करण्यात आली. दरम्यान कुणाल कामराने (Kunal Kamra) या प्रकरणात चौकशीला येण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हॅबिटट स्टुडिओ तसेच या शोशी संबंधित असलेले इतर लोक यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.