ICC Panel of Umpires : आयसीसीच्या पंचांच्या पॅनलमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय पंच

ICC Panel of Umpires : यंदा पॅनलमध्ये दोन पंच बदलले आहेत.

50
ICC Panel of Umpires : आयसीसीच्या पंचांच्या पॅनलमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय पंच
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचगिरी करण्यासाठी नवीन पॅनलची घोषणा केली आहे. यात नितीन मेनन या एकमेव भारतीयाचं नाव आहे. मेनन हे सध्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे पंच आहेत. अनुभव ज्येष्ठता आणि मैदानावरील कामगिरी या दोन्ही निकषांवर ते रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या खालोखाल नावाजले जातात. मायकेल गॉ आणि जोएल विल्सन या दोन आधीच्या ज्येष्ठ पंचांनी यंदा विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या जागी ॲलेक्स व्हॉर्प तसच अलहाउद्दिन पालेकर यांची नेमणूक झाली आहे. (ICC Panel of Umpires)

‘जागतिक स्तरावर हजारो प्रेक्षकांसमोर पंच म्हणून काम करतानाची आव्हानं वेगळी आहेत आणि हे दडपण आणणारं काम आहे. पंचांच्या कामगिरीची सतत मीमांसा होत असते. पण, सध्या पॅनलमध्ये असलेले पंच हे अनुभवी आणि कुशल आहेत. त्यांना हे दडपण हाताळणं अजिबात कठीण जाणार नाही. अल्लाहुद्गिन आणि ॲलेक्स हे नवीन पंचही हे दडपण हाताळण्यासाठी सक्षम आहेत,’ असं आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी बोलून दाखवलं आहे. (ICC Panel of Umpires)

(हेही वाचा – MNS Gudi Padwa Melava : मुंबई पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेच्या सूचना जारी)

अल्लाहुद्दिन पालेकर हे दक्षिण आफ्रिकेत देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यांचे वडील जमालुद्दिन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचगिरी करणार असल्याबद्दल अल्लाहुद्दिन यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर ॲलेक्स वॉर्फ इंग्लंडच्याच मायकेल वॉ यांची जागा घेणार आहेत. (ICC Panel of Umpires)

२०२५-२६ साठी आयसीसीचं आंतरारष्ट्रीय पॅनल सध्या १२ पंचांचं असेल : 

रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), ख्रिस्तोफर गॅफनी (न्यूझीलंड), ॲड्रियन होल्डस्टॉक (द आफ्रिका), रिचर्ड केटलबरो (इंग्लंड), नितीन मेनन (भारत), अल्लाहुद्दिन पालेकर (द आफ्रिका), अहसान रझा (पाकिस्तान), पॉल रायफल (ऑस्ट्रेलिया), शर्फुद्गोला इब्न शहीद (बांगलादेश), रॉडनी टकर (इंग्लंड) व ॲलेक्स व्हॉर्फ (ICC Panel of Umpires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.