आमचे सरकार प्रगतीचे, महाराष्ट्र थांबणार नाही; DCM Eknath Shinde यांचे विधान

57
आमचे सरकार प्रगतीचे, महाराष्ट्र थांबणार नाही; DCM Eknath Shinde यांचे विधान
  • प्रतिनिधी

“आमचे सरकार स्थगिती नव्हे, तर प्रगती सरकार आहे. महाराष्ट्र आता संविधानाच्या मार्गावर दमदार वाटचाल करत असून, तो थांबणार नाही,” असे ठाम विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. विधान परिषदेत नियम २५९ अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी राज्याच्या विकासाचे चित्र रेखाटले आणि विरोधकांना प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात विकासाची नवी पहाट उजाडत आहे,” असे सांगत त्यांनी राज्याच्या उपलब्धींची माहिती दिली.

महाराष्ट्र देशात अव्वल

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. “जीडीपी, निर्यात, औद्योगिक उत्पादन, जीएसटी संकलन, स्टार्टअप्स आणि थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छतेतही राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे. १० लाख कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प राज्यात सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले. कल्याणकारी योजनांमध्येही महाराष्ट्र आघाडीवर असून, भविष्याबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

(हेही वाचा – Mumbai Airport वर शौचालयाच्या कचरापेटीत सापडले मृत अर्भक)

शेती आणि तंत्रज्ञानावर भर

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “पिक विमा आणि ई-पीक पाहणीसाठी नुकतीच बैठक घेतली. शेतकऱ्यांसाठी सिंगल विंडो ॲप आणि संकेतस्थळ विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स शेतीत गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एआय तंत्रज्ञानाने शेतीचे उत्पन्न दुप्पट-चौपट करण्याचे उद्दिष्ट आहे.” डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राला देशात अव्वल बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

पायाभूत सुविधा आणि पर्यटन

“मेट्रो, अंतर्गत मेट्रो, पॉड टॅक्सी, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गातून कनेक्टिव्हिटी मजबूत करत आहोत. पर्यटनासाठी सर्वसमावेशक धोरण राबवत आहोत. कृषी, साहसी, कॅरॅव्हॅन आणि बीच शॅक धोरणांची अंमलबजावणी होईल. गड-किल्ल्यांवर वेलनेस सेंटर्स उभारणार असून, मे महिन्यात महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव होईल,” असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी जाहीर केले. नुकत्याच झालेल्या वॉर रूम बैठकीत १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – India Bids For Olympics : अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक भरवायला ३४ ते ६५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित)

कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा

कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “महिलांवर अत्याचाराला ‘झिरो टॉलरन्स’ आहे. प्रत्येक बहिणीला निर्भयपणे वावरता यावे, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. दोषसिद्धीचा दर २०१५ मध्ये ३३% होता, तो २०२४ मध्ये ५०.५% झाला आहे. एआयच्या मदतीने हा दर ७५% पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.”

शेतकरी हित आणि आर्थिक स्थिती

“कापूस आणि सोयाबीन खरेदी व्यवस्थित सुरू आहे. यंदा १४३.८१ लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी झाली. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. केंद्राकडे मुदतवाढीची विनंती केली आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. “देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले महाराष्ट्र जीडीपीत अव्वल आहे. कर्जाचे प्रमाण फक्त १८% असून, हे देशात सर्वात कमी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

(हेही वाचा – “त्यावेळी जे बोललो ते योग्य होते”; जुन्या व्हिडिओचे DCM Ajit Pawar यांच्याकडून समर्थन)

प्रगतीचे आवाहन

“महाराष्ट्र अश्वमेधाचा घोडा घेऊन यशाच्या शिखराकडे निघाला आहे. कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा बीमोड करू. विकासाची नवी पहाट स्वागताला दोन्ही हात पसरून उभे राहूया. एकदिलाने महाराष्ट्र पुढे नेऊया,” असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केले. त्यांच्या या भाषणाने विधान परिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.