Budget Session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वाजले सूप; दररोज सरासरी ९ तास झाले कामकाज

या अधिवेशनात (Budget Session 2025) लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.

58

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चा (Budget Session 2025) समारोप बुधवार, 26 मार्च या दिवशी झाले. अधिवेशनात विरोधकांनी त्यांच्या परीने अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिवेशनात लोकांच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर तितकीशी चर्चा झालेली दिसली नसली तरी जितके दिवस अधिवेशन झाले, त्याच्या सरासरी प्रतिदिन 9 तास 5 मिनिटे कामकाज झाले, हे जमेची बाजू या अधिवेशनाची ठरली.

या अधिवेशनात (Budget Session 2025) भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. विरोधक आणि सत्ताधारी यांनी या विषयात सहभाग घेताना कुणी संविधानाची पायमल्ली केली याची उदाहरणे देण्याची जणू स्पर्ध्याच लावली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण केले, त्याचे शिवसेना उबाठाने कौतुक केले. दरम्यान, या अधिवेशनात (Budget Session 2025) लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार, 30 जून 2025 रोजी होणार आहे.

अधिवेशन सत्र कालावधीतील कामकाजाची आकडेवारी

  • एकूण बैठकींची संख्या – 16
  • प्रत्यक्ष झालेले कामकाज – 146
  • अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ 1 तास 25 मिनिटे
  • मंत्री उपस्थित नसल्याने वाया गेलेला वेळ 20 मिनिटे
  •  रोजचे सरासरी कामकाज 9 तास 7 मिनिटे

(हेही वाचा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे सूचक विधान; म्हणाले, अजून काही काळ…)

तारांकित प्रश्न

  • प्राप्त प्रश्न – 6 हजार 937
  • स्वीकृत प्रश्न – 491
  • उत्तरीत झालेले प्रश्न – 76

अल्पसूचना प्रश्न

  • प्राप्त प्रश्न – 14
  • अस्वीकृत – 13
  • संमिलित – 1

अल्पकालीन चर्चा

प्राप्त सूचना – 2, मान्य 1, अमान्य 1

एकूण प्राप्त लक्षवेधी सूचना – 2 हजार 557

  • स्वीकृत सूचना – 442
  • चर्चा झालेल्या सूचना – 129

नियम 97 अन्वयेच्या सूचना

  • प्राप्त सूचना – 60
  • मान्य – निरंकर
  • चर्चा झाली – निरंकर

शासकीय विधेयके

  • प्रस्तापित – 9
  • संमत – 9
  • विधान परिषद संमत – 3

अशासकीय विधेयके

  • प्राप्त सूचना – 42
  • मान्य – 22
  • प्रस्तापित – 22
  • विचारात घेतलेली – निरंक
  • संमत – निरंक

शासकीय ठराव

  • प्राप्त सूचना – 2
  • मान्य – 2
  • चर्चा झाली – 2

नियम 293 अन्वये प्रस्ताव

  • प्राप्त सूचना – 5
  • मान्य – 5
  • चर्चा झाली – 5

अर्धातास चर्चा

  • प्राप्त सूचना – 54
  • स्वीकृत – 42
  • चर्चा झाल्या – 3

सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर

  • प्राप्त सूचना – 209
  • मान्य सूचना – 48
  • चर्चा झाली – 3

अशासकीय ठराव

  • प्राप्त सूचना – 151
  • मान्य – 94
  • चर्चा झाली – 2
  • अभिनंदन प्रस्ताव ४

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.