राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र धर्माचे प्रतीक; सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेने जावे लागेल; CM Devendra Fadnavis यांचे संविधानावरील चर्चेत स्पष्ट मत

डॉ. आंबेडकरांनी सांगितले कुठलेही संविधान वाईट नसते, संविधान वागवणारे कसे आहेत, या आधारावर ते संविधान चांगले किंवा वाईट ठरते. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) सांगितले.

62

भारताचे संविधान हे 10-12 देशांच्या संविधानातील गोष्टींपासून तयार झाल्याचा आरोप करतात. पण तसे नाही. हे पूर्णतः भारतीय तत्वांवर तयार करण्यात आलेले संविधान आहे. संविधान सभेमध्ये भारताच्या ध्वजावर चर्चा सुरू होती, तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, जोवर आपण सद्गुणांवर चालत नाही, तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य व धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत संविधानातील चर्चेत सहभागी होऊन मांडले.

धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला, तो बदलांना प्रतिकार केल्यामुळे… आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही, तोवर आपण सत्य व सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की, एका ठिकाणी थांबलो की एकेठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे, ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

(हेही वाचा Budget Session 2025 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वाजले सूप; दररोज सरासरी ९ तास झाले कामकाज)

संविधान कोणीही बदलू शकत नाही

संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बदडणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे की, आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. आपले संविधान सातत्याने बदलण्याचे काम 1967 ते 1977 या कालखंडात झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे लक्षात घेतले. संविधानातील लवचिकता अशीच राहिली, तर जे डॉ. आंबेडकरांनी सांगितले कुठलेही संविधान वाईट नसते, संविधान वागवणारे कसे आहेत, या आधारावर ते संविधान चांगले किंवा वाईट ठरते. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) सांगितले. शहाबानोचा दिलेला निकाल बदलण्यासाठी तुम्ही संविधान बदलले. तर तीन तलाक संपवण्यासाठी आम्ही त्याठिकाणी संशोधन केले. या संविधानाने सीतेची मुक्तता दाखवली आहे. पंडीत नेहरूंनी 370 कलम घालण्यासाठी आग्रह केला होता. त्यावेळी मी ड्राफ्ट तयार करणार नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. रस्ते आमच्याकडून बनवून घ्यायचे, रेशन आमच्याकडून घ्यायचे, सोयी आमच्याकडून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडून घ्यायच्या आणि संविधानातच स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवायचा हे मला मान्य नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते. त्यावर खूप चर्चा झाल्या, आणि शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच गोष्टीवर मान्यता दिली की, 370 हे कलम कायमचे नाही, तर तात्पुरते असेल. डॉ. बाबासाहेबांचे ते स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आणि 370 कलम संपवण्याचे काम केले, असे देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले. दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानावरील भाषणाचे कौतुक करण्यात आले. ठाकरे गटाचे आमदार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचे पुस्तक तयार करण्याची मागणी विधिमंडळात केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.