BMC : बांधकाम विकासकांची चिंता मिटली; ‘डेब्रिज ऑन कॉल’ ची सेवा जोडली आता ऑटो डिसीआरला

765
BMC : उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता एक हजार रुपयांचा दंड
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रिज) संकलित करणे, वाहून नेणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाच्या माध्यमातून दहिसर आणि शीळफाटा या दोन ठिकाणी राडारोडा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याकरिता ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी ऑनलाईन सेवा देखील कार्यान्वित आहे. या सेवेचा महानगरपालिकेने आता विस्तार केला आहे. मोठ्या विकास प्रकल्पांमधील राडारोडाही जमा होऊन त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया व्हावी, यासाठी ‘ऑटोडिसीआर’ या प्रणालीमध्ये ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (BMC)

मुंबईतील घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रिज) उचलून वाहून नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवा सन २०१४ पासून पुरवली जाते. रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणारे डेब्रिजचे प्रकार टाळण्यासाठी सुरु केलेली ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय ही सेवा उपलब्ध आहे. ही सेवा अधिक लोकाभिमुख, जलद होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्था उभी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. (BMC)

(हेही वाचा – Sushma Andhare यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल)

तसेच, ‘मायबीएमसी’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पर्याय कार्यान्वित करण्यात येत आहे जो २४ तास उपलब्ध असेल. संपूर्ण भारतातील अशा प्रकारचा ‘ऑनलाईन’ सेवा असलेला हा पहिलाच उपक्रम आहे. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. (BMC)

यामध्ये, मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलूंड) मेसर्स मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा शिळफाटा, डायघर गाव येथे पाच एकर जागेवर स्थित आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रति दिन इतकी आहे. तर पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा दहिसर, जागेवर स्थित आहे कोकणीपाडा येथे पाच एकर या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रतिदिन इतकी आहे. म्हणजेच, दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा लक्षात घेता, प्रतिदिन १२०० टन डेब्रिजवर प्रक्रिया होणार आहे. प्रतिदिन १२०० टन प्रक्रिया ही क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा राडारोडा प्रक्रिया प्रकल्प आहे. (BMC)

(हेही वाचा – राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र धर्माचे प्रतीक; सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेने जावे लागेल; CM Devendra Fadnavis यांचे संविधानावरील चर्चेत स्पष्ट मत)

‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन झाल्यानंतर घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा जमा करण्याचे प्रमाण वाढू लागले. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यासोबत, मोठ्या प्रकल्पांकडून, विकासकांकडूनही या सेवेमध्ये समावेश होण्याची मागणी होऊ लागली. ही बाब लक्षात घेता, तसेच राडारोडा प्रक्रियेचे प्रत्येक प्रकल्पावर वार्षिक किमान २ लाख १९ हजार टन उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने ‘ऑटोडिसीआर’ या प्रणालीमध्ये ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेचा समावेश केला आहे. यामुळे मोठ्या प्रकल्पांना, विकासकांना बांधकामे/निष्कासन आदी करताना अथवा जिथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा तयार होतो अशा घटकांना तेथील राडारोड्याची नोंदणी ‘ऑटोडिसीआर’ या प्रणालीमध्ये करता येईल. (BMC)

याबद्दल माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवा आता ‘ऑटोडिसीआर’ या प्रणालीमध्ये समाविष्ट झाल्याने स्वाभाविक मोठ्या स्वरुपात राडारोडा निर्माण होणाऱ्या ठिकाणांहून त्याचे संकलन, वाहतूक व शास्त्रोक्त प्रक्रिया यांचे प्रमाण तर वाढेलच. प्रत्येक प्रकल्पावर वार्षिक सुमारे २ लाख १९ हजार टन म्हणजेच एकूण ४ लाख ३८ हजार टन राडारोडा प्रक्रिया साध्य होऊ शकेल. तसेच महसुलात देखील भर पडेल. (BMC)

(हेही वाचा – Aaditya Thackeray नार्को टेस्टला का तयार नाही? शिवसेना आमदाराचा सवाल)

प्रकल्पांमध्ये शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यानंतर राडारोड्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी संबंधित उद्योगांना वापरात येतात स्वाभाविकच ‘ऑटोडिसीआर’ मध्ये ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा समाविष्ट केल्याने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाला अधिक चालना मिळेल, असेही दिघावकर यांनी नमूद केले. (BMC)

कंत्राटदाराने राडारोडा वाहून नेल्यास असेल हा दर :
  • शहर व पूर्व उपनगरांसाठी प्रतिटन १,४२५ रुपये
  • पश्चिम उपनगरांसाठी प्रतिटन १,४१५ रुपये

(हेही वाचा – India Bids For Olympics : अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक भरवायला ३४ ते ६५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित)

विकासकांनी स्वतः राडारोडा प्रक्रिया केंद्रावर आणल्यास असे असतील दर :
  • शहर व पूर्व उपनगरांसाठी प्रतिटन ७१५ रुपये
  • पश्चिम उपनगरांसाठी प्रतिटन ७१० रुपये
कोणत्या टोल फ्रि क्रमांकावर आपण संपर्क साधाल?
  • मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४
  • पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६
  • टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.