संयुक्त राष्ट्र संघाने (UN) भारताचे विशेष कौतुक केले आहे. कारण भारताने लाखो बालकांचे प्राण वाचवले आहेत. भारताच्या विशेष प्रयत्नामुळे बालमृत्यू कमी झाले आहेत. भारताचे प्रयत्न म्हणजे आदर्श आणि अनुकरणीय उदाहरण, अशा शब्दांत UN ने भारतावर कौतुकाची पाठ थोपटली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या (UN) या अहवालामुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक प्रगतीचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटर-एजन्सी ग्रुप फॉर चाईल्ड मॉर्टॅलिटी एस्टिमेशन (UN IGME) ने मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात, बालमृत्यू दर कमी करण्यात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या पाच देशांची नोंद केली आहे. यात भारत, नेपाळ, सेनेगल, घाना आणि बुरुंडी या देशांचा समावेश आहे. या देशांनी विविध धोरणांतून टाळता येणारे बालमृत्यू कमी करण्याच्या दिशेने वेगवान प्रगती साधली आहे. या अहवालात म्हटले आहे की, राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक संशोधनावर आधारित धोरणे आणि आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुंतवणूक यांच्या माध्यमातून, मर्यादित संसाधने असलेल्या देशांमध्येही लक्षणीय सुधारणांसह बालमृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटवता येऊ शकते. या यशामुळे जग टाळता येण्याजोग्या बालमृत्यूच्या संपूर्ण उच्चाटनाच्या दिशेने पुढे जात आहे. भारताने आरोग्य यंत्रणेमध्ये केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आधीच लाखो बालकांचे प्राण वाचवले आहेत आणि कोट्यवधी बालकांच्या निरोगी आयुष्याची वाट मोकळी केली आहे. (UN)
सन 2000 सालापासून, भारताने पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण 70 टक्के आणि नवजात बालमृत्यूचे प्रमाण 61 टक्के कमी केले आहे. व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार करणे यांसारख्या विविध उपक्रमांमुळे हे यश मिळाले आहे. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे, जो प्रतिकुटुंब दरवर्षी सुमारे 5500 अमेरिकी डॉलर (अंदाजे ₹4.5 लाख) इतके कव्हरेज प्रदान करतो.
Join Our WhatsApp Community