पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील पाच जणांना प्रवासी बसमधून खाली ओढून गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्वादर जिल्ह्यात हा हल्ला झाला तेव्हा बंदूकधाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात कराचीला जाणाऱ्या बसमधील पाच प्रवाशांची हत्या केली. एका जखमी प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या सहा झाली. बंदूकधाऱ्यांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर त्यांची हत्या केली आणि इतर तिघांना घेऊन गेले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले, ‘दहशतवादी हे देशाच्या विकासाचे आणि बलुचिस्तानच्या समृद्धीचे शत्रू आहेत.’ त्यांना बलुचिस्तानमध्ये (Balochistan) प्रगती दिसत नाही. काही दिवसापूर्वीच ४४० प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस बलुच लिबरेशनने अडवली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक हल्ला करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community