लोकसभेत इमिग्रेशन विधेयक मंजूर; Amit Shah यांनी थेट घुसखोरांनाच दिला इशारा; म्हणाले…

वैयक्तिक फायद्यासाठी भारतात आश्रय घेणार्‍या अशा लोकांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे देश असुरक्षित झाला आहे, जर भारतात अशांतता निर्माण केली तर घुसखोरांवर कठोर कारवाई करू, असे मंत्री शाह (Amit Shah) यांनी म्यानमार आणि बांगलादेशातून आलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांच्या भारतात बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्द्यावर इशारा दिला.

142
इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५ बुधवार, २७ मार्चला लोकसभेत संमत झाले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेत भाग घेताना थेट घुसखोरांना इशाराच दिला. “राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. देश म्हणजे ‘धर्मशाळा’ नाही, असे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त अशाच लोकांना रोखेल ज्यांचा भारताला भेट देण्याचा हेतू दूषित आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. देश म्हणजे ‘धर्मशाळा’ नाही. जर कोणी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी देशात येत असेल तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे, असेही मंत्री शाह (Amit Shah) यावेळी म्हणाले. हा कायदा देशाच्या सुरक्षेला बळ देईल, अर्थव्यवस्था आणि उद्योगांना बळ मिळेल. याबरोबरच आरोग्य  आणि शिक्षण क्षेत्राला देखील प्रोत्साहन मिळेल. तसेच इमिग्रेशन विधेयकामुळे भारत देशात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची ताजी माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.
वैयक्तिक फायद्यासाठी भारतात आश्रय घेणार्‍या अशा लोकांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे देश असुरक्षित झाला आहे, जर भारतात अशांतता निर्माण केली तर घुसखोरांवर कठोर कारवाई करू, असे मंत्री शाह (Amit Shah) यांनी म्यानमार आणि बांगलादेशातून आलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांच्या भारतात बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्द्यावर इशारा दिला.
या विधेयकामनुळे देशाची सुरक्षा बळकट होईल आणि यामुळे २०४७ पर्यंत भारत जगातील सर्वात विकसित देश बनेल, भारत-बांगलादेश सीमेवरील ४५० किमी लांबीचे कुंपण घालण्याचे काम प्रलंबित आहे कारण पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते गोंधळ करू लागतात आणि धार्मिक घोषणाबाजी करून यात अडथळा आणतात, असेही मंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.