सचिन धानजी
BMC : मुंबईतील संभाव्य प्रदुषणकारी घटनांवरती तातडीचे उपाय सुचविणारी अशी आगाऊ सूचना यंत्रणा आता मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बसवली जाणार आहे. हवेच्या शुध्दत्तेसाठी (air purity) एक डायनॅमिक मॉडेलिंग सिस्टिम (Dynamic Modeling System) तयार करुन घेण्यात येत असून या यंत्रणेमुळे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून व त्याचे नियोजन करता येणार आहे. या यंत्रणेद्वारे मुंबई शहरात संभाव्य हवेचे प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी स्त्रोतांच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांकरता परिणामकारक माहिती, तसेच संभाव्य हवा प्रदूषणात वाढ होणाऱ्या दिवसांबद्दलची माहिती उपलब्ध होणार आहे. दिल्लीमध्ये (Delhi) या यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने याचा वापर आता मुंबईत केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईत आता दिल्ली पॅटनेचा (Delhi Pattern) वापर केला जाणार आहे. (BMC)
मुंबई शहरात सद्यस्थितीत निवासी व व्यावसायिक बांधकामे तसेच सागरी किनारा रस्ता, शहरी रस्ते, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो इत्यादी बरीचशी पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. तसेच वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात पीएम २.५ व पी.एम. १० प्रतीच्या धुळीचे प्रमाण वाढले आहे. साधारण वातावरणात पश्चिमी वाऱ्यांमुळे शहरातील धूळ मिश्रीत धुके समुद्राकडे वाहत जाते. परंतु वातावरण बदलामुळे प्रामुख्याने हिवाळ्यात वाहत्या वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणातील प्रदुषित धुके मुंबई (Foggy Mumbai) शहरावरच आच्छादून राहते आणि असे प्रदुषण आरोग्यास घातक असते.
(हेही वाचा – BMC: क्लीनअप मार्शलकडून होणारी लूट अखेर थांबणार, येत्या ४ एप्रिलपासून संस्थांची सेवाच रद्द)
मुंबईतील हवेच्या खालावलेल्या प्रतीमुळे मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांची कसून निरीक्षणे उच्च न्यायालयाने नोंदवली असून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (म.प्र.नि.नं.), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान (IITM) व मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) यांनी मुंबईत बसविलेल्या हवा गुणवत्ता केंद्रांमधील निष्कर्षानुसार मुख्यतः हिवाळ्यात मुंबईची गुणवत्ता मध्यम ते खराब दर्शवते. प्रदूषणावर पुरेपूर उपाय करुन जेथे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, तेथे सुधारित वातावरणासाठी पुरेसे उपाय करणे जरुरीचे असल्याचेही न्यायालयाने नमुद केले होते.
मुंबईसारखीच दिल्ली शहरात वायूप्रदुषणाची समस्या भेडसावत असल्याने पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, भारतीय हवामान विभाग व भारतीय मध्यम अवधी हवामान पुर्वानुमान केंद्र यांनी एकत्रपणे उच्च रिझोल्यूशन हवा गुणवत्ता प्रणाली ही दिल्ली एनसीआर विभागासाठी तयार केली आहे. ही प्रणाली हवामानाचा अंदाज, प्रदुषण हे लो कॉस्ट सेन्सरच्या डेटावर आधारीत पुढील सात दिवसांसाठी हवेच्या गुणवत्तेबाबत आगावू सूचना देते. शासकीय यंत्रणेला संभाव्य प्रदूषणकारी स्त्रोतांचा अचूक अंदाज असणे गरजेचे असते.तसेच शहरात होवू शकणाऱ्या खराब हवेच्या घटना, कशा टाळता येतील याचा अंदाज तथा माहिती त्याद्वारे मिळते. संभाव्य प्रदुषणकारी घटनांवर तातडीने उपाय सूचवणारी अशी आगावू सूचना देणारी यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नाही. या प्रकारच्या अडचणींसाठी आयआयटीएम यांच्याकडून हवेच्या शुध्दतेसाठी हवेच्या शुध्दतेसाठी एक डायनॅमिक मॉडेलिंग सिस्टीम तयार करून घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या यंत्रणेचा वापर केल्यामुळे यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे निर्णय घेवून तसेच पावले उचलल्यामुळे संभाव्य प्रदुषित हवेमुळै दिल्लीतील एअर क्वॉलिटी इंडेक्स (Air Quality Index) हा २० ते २२ टक्के खराब होण्यापासून ते वाचवू शकले आहेत. त्यामुळे अशी प्रणाली महापालिकेच्यावतीने बसवली जाणार असून यासाठी ३ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयआयटीएम च्या या आगावू सूचना प्रणाली अर्थात एअरवाईज सहीत डीएसएस कमांड सेंटरमध्ये मुंबई शहरातील २८ सीएएक्यूएमएस प्रणालीतील डेटा, तसेच प्रस्तावित ७५ लो कॉस्ट सेन्सर लावून येणारा डेटा, वातावरणातील बदल व इतर आवश्यक डेटा वापरुन एअरवाईज प्रणालीमध्ये त्यानसार आगाव सूचना देणारी यंत्रणा तयार होईल,असे त्यांनी स्पष्ट केली. याचा फायदा मुंबई महापालिकेला होईल,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community