जे विद्यार्थी नियमित वर्गांमध्ये जाणार नाहीत, त्यांना १२वी बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशारा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईने (CBSE) दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वत: विद्यार्थी व त्यांच्या पालकांची असेल. (CBSE)
हेही वाचा-Trimbakeshwar ला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी
सीबीएसई (CBSE) डमी शाळांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखण्यासाठी परीक्षा उपनियमांत बदल करण्यावर विचार करीत आहे. त्यांना एनआयओएसची परीक्षा द्यावी लागेल. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एखादा परीक्षार्थी शाळेतून गायब असल्याचे आढळल्यास किंवा बोर्डाकडून करण्यात आलेल्या अचानक निरीक्षणात अनुपस्थित असल्यास अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. नियमितरीत्या वर्गात न जाण्याचे दुष्परिणाम भोगण्यास संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक जबाबदार असतील. (CBSE)
हेही वाचा- BMC : मुंबईतील संभाव्य प्रदुषणाची माहिती मिळवण्यासाठी ‘दिल्ली’ पॅटर्न
अलीकडेच बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला व हा निर्णय २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात लागू करावा, अशी शिफारस करण्यात आली होती. (CBSE)
अधिकाऱ्याने सांगितले की, परीक्षा समितीमध्ये या मुद्द्यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली व बोर्डाच्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी, असा निष्कर्ष काढण्यात आला. अपेक्षित उपस्थिती पूर्ण न झाल्यास केवळ गैरउपस्थिती असणाऱ्या शाळांमध्ये नामांकन घेतल्यामुळे असा विद्यार्थी सीबीएसई परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत नाही. (CBSE)
ज्या विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती भरणार नाही, बोर्ड त्यांच्या पात्रतेवर कोणताही विचार करणार नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणीकृत करणाऱ्या शाळेच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते का, यावर बोर्डाचा विचार सुरू आहे. (CBSE)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community