भाजपा आमदार Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या, तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी…

95
भाजपा आमदार Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या, तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी...
भाजपा आमदार Chitra Wagh यांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या, तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी...

केंद्रात असणाऱ्या मोदी सरकारने अल्पसंख्याक समुदायासाठी नवीन अभियान सुरु केले आहे. या अभियानाचे नाव सौगात ए मोदी आहे. या अभियानाआडून मोदी सरकारवर (Modi government) टीका होत असून त्यात उबाठा पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यातच भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उबाठा पक्षाच्या नेत्यांना धारेवर धरले आहे. (Chitra Wagh)

( हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार; २ कोटी ६३ लाख अर्जांची पडताळणी होणार

चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणात इतके बरबटले आहात की तुम्हाला सावरकरांचाही विसर पडलाय. काय म्हणाले होते सावरकर (Swatantra Veer Savarkar) , हिंदू म्हणजे कोण? तर हिंदू (Hindu) म्हणजे, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू (Hindu). त्यामुळेच आम्ही दिवाळीला जसा आनंदाचा शिधा देतो तसंच पंतप्रधानांनी सौगात-ए -मोदी दिलं तर ठाकरे घाबरले वाटतं? आम्ही कायम म्हणते की आम्हाला हिंदुंत्वाचा सार्थ अभिमान आहे. हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते की, गर्व से कहो हम हिंदू (Hindu) है. त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत पण तुमंच काय…?, असा सवाल वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरेंना केला आहे. (Chitra Wagh)

तसेच उलेमा बोर्डाच्या (Ulema Board) १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्त्व (Hindutva)आठवलं नाही? वक्फ बोर्डाच्या सुधारित बिला विरूध्द तुमचे नेते मतदान करतात तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्त्व? या देशाच्या १४० कोटी जनतेला आपलं कुटुंब मानणाऱ्या,वसुधैव कुटुंबकम् म्हणत जगणाऱ्या आणि साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल बोलण्याची तुमची कुवत नाही. तुम्ही आजही जातीवाद करण्यात मश्गुल आहात, देशाभिमान आणि राष्ट्राचं सन्मान याच्याशी तुमचं देणंघेणं नाही. आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं देखील तुम्हाला सोयंर राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी करा. त्यामध्ये औरंग्याचे गुणगाण गाणाऱ्यांवर टाळ्या वाजवा, असा टोलाही वाघ (Chitra Wagh) यांनी उबाठा शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.