माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मुख्य माहिती आयुक्तपदासाठी राज्य सरकारने नागपूरचे माजी माहिती आयुक्त राहुल पांडे यांची नियुक्ती प्रस्तावित केली आहे. माजी पत्रकार राहुल पांडे (Rahul Pandey) यांची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागपूरचे माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत या भूमिकेत काम केले आणि छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि अमरावती विभागांसाठी अतिरिक्त जबाबदाऱ्याही सांभाळल्या. त्यामुळे पुन्हा मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यास पांडे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.
( हेही वाचा : “तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?” ; Sandeep Deshpande यांचा ठाकरेंना सवाल)
दरम्यान राज्य सरकारने माहिती आयुक्त पदासाठी तीन उमेदवारांची यादी देखील निवडली आहे. त्यापैकी नागपूर तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव (Gajanan Nimdev) यांचाही समावेश आहे. दि. २५ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या चारही नावांना मंजुरी देण्यात आली. या शिफारसी अंतिम मंजुरीसाठी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. तरी अंतिम मंजुरीनंतर माहिती आयुक्त पदाची औपचारिक घोषणा करण्यात येईल. यापूर्वी, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड (Ratnakar Gaikwad) आणि सुमित मलिक (Sumit Malik) यांनी मुख्य माहिती आयुक्त म्हणून काम पाहिले होते. मलिक यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले आहे. (Gajanan Nimdev)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community