मुलुंड पश्चिम येथील जी.जी.एस रोडवरील नाला कल्व्हर्टवरील भाग पुन्हा एकदा खचला. पाच वर्षांपूर्वी या रस्त्यावरील हाच भाग थोडाफार खचू लागला होता. त्यामुळे या भागाची डागडुजी करण्यात आली होती. परंतु हाच भाग पुन्हा एकदा खचून रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवावी लागली आहे.
नाल्यामुळेच खचला रस्ता
मुलुंड पश्चिम येथील जी.जी. एस. रोडवरील काही भाग शुक्रवारी संध्याकाळी अचानक खचला. या रस्त्याखालील भागात मोकळी पोकळी निर्माण झाल्याने हा भाग खचला होता. रस्त्याखालून नाला जात असून त्याचा कल्व्हर्टचा भाग आहे. या नाल्यामुळेच हा रस्ता खचला असल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांपूर्वी याच भागातील काही भागात दबला गेला होता. त्यामुळे हा रस्ता खचला जाण्याची भीती असल्याने तत्कालिन भाजप नगरसेविका समिता कांबळे यांनी या रस्त्यांची डागडुजी करून घेतली होती. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्वत: रस्ते विभागाला परवानगी देत या रस्त्याचे काम करून घेतले होते. परंतु पाच वर्षांतच हाच भाग पुन्हा खचला आहे. त्यामुळे रस्त्याखालून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा अंदाज न घेता या रस्त्याचे बांधकाम केले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, काही स्थानिकांच्या मते हा भाग मागील अनेकदा खचला जात होता, असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा : दीपाली चव्हाणांच्या आत्महत्येस कारणीभूत अधिकाऱ्यावरील गुन्हा रद्द!)
Join Our WhatsApp Community