महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे – भाजप युतीची चर्चा सुरु असतानाच मनसेच्या एका नेत्याचे भाजप टेंशन वाढवणार आहे. हे नेते दुसरे तिसरे कुणी नसून, सध्या पत्नीच्या आरोपामुळे चर्चेत असलेले गजानन काळे आहेत. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिसांचा दबाब वाढत असल्याचा आरोप केला. यात भाजपने देखील उडी घेतली आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा लावून धरला असून, त्या गजानन काळे यांच्या पत्नीच्या मागे उभ्या राहिल्या आहेत. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे सध्या चर्चेत आहेत, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंंभीर आरोप केले. मात्र आता त्यांच्या पत्नीने पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेला व्हिडिओ भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शेअर केला असून, ‘हे काय चालले आहे राज्यात?’, असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.
संजीवनी काळेंच्या व्हिडिओतून आरोप
संजीवनी काळे यांनी व्हिडिओतून गंभीर आरोप केला असून, मी ११ ऑगस्टला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अटक करण्यात आलेली नाही. मला न्याय मिळालेला नाही. मी काल पोलिसांकडे गेले होते, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सेटलमेंट करण्याचा विषय झाल्याचे म्हटले आहे. चित्राताई मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, तो पण माझ्या मुलासाठी, असे संजीवनी काळे या व्हिडिओमध्ये म्हणाल्या. दरम्यान चित्रा वाघ यांनी हे काय चालले आहे राज्यात? आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा, असे आदेश दिलेत का? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलिस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या’, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
(हेही वाचा : ‘या’ कारणासाठी मुंबई विद्यापीठच उडवण्याची दिली धमकी!)
याआधी काय केले आरोप!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि अनैतिक संबंध असल्याचे म्हणत पोलिसांत तक्रार दिली आहे. नवी मुंबईच्या नेरुळ पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन काळे यांनी किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग व माझी जात यावरुन मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले. परंतु त्याचा मला काही एक फायदा झाला नाही. यावरुन तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी गजाननने मला मारहाण केली होती. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना फोन केला असता ते माझ्या घरी आले. या वादानंतर मी माहेरी निघून जाणे पसंत केले. मात्र काही दिवसांनी समजूत काढून पुन्हा वाद होणार नाही, असे पटवून त्याने पुन्हा मला घरी आणले. मात्र पुन्हा वाद होऊ लागल्याने शारीरिक व मानसिक त्रास झाल्याने दादर येथे मी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होते. वर्षभर हे उपचार सुरू होते. दरम्यान, ‘गजानन याचे इतर स्त्रियांसोबत अनैतिक संबंध असल्याची खात्री फोनवरील संभाषणवरून झाली होती. पण दुसरीकडे समाजात त्याची प्रतिमा चांगली राहावी व लोकांना वाटावे कुटुंबवत्सल आहे, हे भासवण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम, लग्नाचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस अशा कार्यक्रमांचे फोटो मला जबरदस्ती सोशल मीडियावर पोस्ट कराव्या लागत होत्या.’ एवढंच नाही तर गजानन काळे म्हणतो की, त्याच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्याच्याकडे आहे. मात्र, असे असताना देखील तो मागील दोन महिन्यांपासून घर खर्च देत नव्हता. अशावेळी मी माझ्या मुलाचा सांभाळ कसा करावा? त्यामुळे आज मी नाईलाजास्तव गजानन विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे संजीवनी काळे म्हणाल्या होत्या.
Join Our WhatsApp Community