खोक्या भोसले (Khokya Bhosale) प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. एका मराठी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत धस (Suresh Dhas) यांनी हा आरोप केला आहे. राजस्थानातून (Rajasthan) बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत (Mumbai) आणली गेली. धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं,बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस (Suresh Dhas) यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा : Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी)
सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट
सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya Bhosale) याला काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर शिकारीसह अनेक आरोप करण्यात आले. तसेच हरणाचे मटण सुरेश धसांना (Suresh Dhas) दिले जात होते,असाही एक आरोप करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर धसांनी गौप्यस्फोट केला की, मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता.बिश्नोई गँगला (Bishnoi Gang) देखील पाचारण करण्यात आलं होतं, असं धसांनी म्हटलं असून त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे आणि गंभीर आरोपांमुळे चांगलीच खळबळ माजलेली आहे.
खोक्या भोसले (Khokya Bhosale) शिकार करत होता. तसेच त्या माध्यमातून खोक्या भोसले (Khokya Bhosale) हा सुरेश धस (Suresh Dhas) यांना हरणाचं मांस पुरवत होता, असे आरोपही काही लोकांनी केले होते. याच आरोपाच्या मुद्यावर बोलताना धस यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला. बिश्नोई गँगला (Bishnoi Gang) मुंबईत आणलं गेलं आणि माझ्या खुनाचा डाव, कट रचण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक खुलासा धस यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community