स्वातंत्र्यदिनी मंत्रालय परिसरात भयंकर प्रकार पहायला मिळाला. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण होत असताना, दुसरीकडे मात्र मंत्रालयाच्या गेटवर एका शेतक-याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा शेतकरी जळगाव येथील असल्याचे समजत असून, जळगाव पोलिस प्रशासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण असताना जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनिल गुजर याने मंत्रालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती एका पत्राद्वारे त्याने एका वृत्तवाहिनीला दिली होती. आर्थिक फसवणुकीवरुन आपण जळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण त्या तक्रारीची योग्य दखल जळगाव पोलिस प्रशासनाने न घेतल्याने आपण आत्मदहन करणार असल्याचे त्या शेतक-याने पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community