भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. वक्फ सुधारणा विधेयक, एक राज्य एक नोंदणी, वीज दर, रेडीरेकनर आणि मुंबईतील बनावट नकाशांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
एक राज्य एक नोंदणी आणि फेसलेस सुविधा
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “१ मेपासून ‘एक राज्य एक नोंदणी’ योजना सुरू होत आहे. यामुळे नागपूरात घर घेतले तरी पुण्यातून नोंदणी करता येईल. आधारकार्ड आणि इन्कम टॅक्ससंदर्भात फेसलेस नोंदणीची सुविधाही उपलब्ध होईल. ही योजना नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल.”
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह, आकाशदीप यांचं पुनरागमन लांबलं)
उद्धव ठाकरे आणि वक्फ बोर्ड
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार सोडले आहेत. वक्फ सुधारणा बिलाला विरोध करून त्यांनी काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लांगूलचालन केले. हे मतदान देशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. जनता त्यांना माफ करणार नाही. ज्या खासदारांना निवडून दिले, तिथे लोकांना आता चूक झाल्याची जाणीव होईल. पुढे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) उमेदवार निवडून येणार नाहीत.” त्यांनी पुढे सांगितले की, “शिवसैनिक आज पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. अनेकजण पक्ष सोडणार असून, मंगळवारी मी स्वतः पक्षप्रवेश घेतला आहे.”
वीज दर आणि सौर ऊर्जा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे कौतुक करताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “फडणवीस यांचे आभार मानतो. शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊन त्यांना सौर ऊर्जेवर आणले. सौर वाहिनी योजनेमुळे क्रॉस सबसिडी कमी झाली, त्यामुळे वीजबिल कमी झाले. ग्राहकांना कमी दरात वीज मिळत असताना कुणीही विरोध करू नये. या योजनेसाठी फडणवीसांचे अभिनंदन.”
(हेही वाचा – Donald Trump Tariff War : अमेरिकेकडून भारतावर २६ टक्के आयात शुल्क, भारत काय उत्तर देणार?)
रेडीरेकनर दर निश्चिती
रेडीरेकनर दरांबाबत ते म्हणाले, “मुंबईत फॉर सिझनला जो दर लागतो, तोच शेजाऱ्यालाही लागतो. झोनिंग नसल्याने ही समस्या आहे. वर्षभरात आम्ही झोनिंग करणार आहोत. जीपीएस मॅपिंग आणि सिटीसीद्वारे हे काम होईल. पुढील वर्षी रेडीरेकनर झोननुसार निश्चित होईल.”
मुंबईतील बनावट नकाशे
मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “१६५ बनावट नकाशे तयार झाले आणि ४६५ बांधकामे अनधिकृतपणे बांधली गेली. आम्ही सर्व नकाशे रद्द केले असून, पालिकेला ही बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. यात काही अधिकारी सामील आहेत आणि काहींना अटकही झाली आहे.”
(हेही वाचा – Andheri मधून बिश्नोई गँगशी संबंधित ५ जणांना अटक; बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट गुन्हे शाखेने उधळला)
हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांच्यावर टीका
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. राहुल गांधींना (Rahul Gandhi) खुश करण्यासाठी ते बोलत आहेत.” तर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत ते म्हणाले, “एखाद्याला पंडू रोग झाला की तो काहीही बडबडतो. भाजपा आणि मोदींचे नाव घेतले की त्यांना विस्मृती होते.”
वक्फ बोर्ड सुधारणा
वक्फ बोर्डाबाबत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “चुकीच्या नोंदी झाल्या आहेत, त्या दुरुस्त होतील. हिंदू, अल्पसंख्याक आणि देवस्थानांच्या जमिनी आहेत. सर्वेक्षणाचे अधिकार मिळतील आणि सर्व कायदेशीर होईल. अतिक्रमण आणि मोघलशाहीमुळे वक्फ बोर्डाची समस्या वाढली, ती दुरुस्त होईल.”
या पत्रकार परिषदेतून बावनकुळे यांनी सरकारच्या योजनांची माहिती देताना विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community