अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा गँगस्टर छोटा शकील याच्या भावाने देखील अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना त्याने लक्ष्य करून खंडण्या उकळण्यास सुरुवात केली आहे. एका खंडणीच्या प्रकरणात छोटा शकीलचा भाऊ अन्वर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
परदेशात बसून चालवतो गँग!
अन्वर हा परदेशात लपून बसला असून आपल्या गुंडा मार्फत तो मुंबईत एक्टिव्ह झाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. ओशिवरा येथे सुरू असलेल्या एका एसआरए प्रकल्पात तडजोड करण्यासाठी गुंड अरबाज नईम शेख आणि राजू उर्फ कामरान या दोघांनी बिल्डरकडे या प्रकल्पात अधिक खोल्या आणि रोकडची मागणी केली होती, यासाठी या दोघांनी छोटा शकीलचाच भाऊ अन्वर याच्या मार्फत बिल्डरला फोन करून धमकी दिली.
(हेही वाचा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोनाबाधित!)
ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बिल्डरने याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात तक्रार दाखल केली असता खंडणी विरोधी पथकाने ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अरबाज आणि कामरान या दोघांना रविवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली.
Join Our WhatsApp Community