गर्डर हटवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन Special Block; पहा वेळापत्रक  

117
Special Block : मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे (Local Railway) संबंधी शनिवार ०४ एप्रिल आणि रविवार ५ एप्रिलला गर्डर हटवण्याच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक (Local Railway Night block) असणार आहे. दरम्यान कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर रात्रकालीन विशेषब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जुना रेल्वे उड्डाण पूल हटवण्याचे काम केले जाणार असून, या कामासाठी मोठ्या क्रेनच्या साहाय्याने चार गर्डर काढण्यात येणार आहेत. (Special Block)

दरम्यान, मध्य रेल्वेने शनिवार (रात्री ०१:३०) ते रविवारी पहाटे (०४:३०) दरम्यान कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर विशेषब्लॉक (Kalyan-Badlapur Night Block) जाहीर केला आहे. यावेळी अंबरनाथ ते कर्जतदरम्यान काही लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Theft : मुंबईत घरफोड्या करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या चोराला अटक)

लोकल ट्रेन सेवांवर परिणाम 

या विशेषब्लॉक दरम्यान काही लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

• शनिवारी रात्री ११:१३ – परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवली जाईल.
•  शनिवारी रात्री ११:५१ – सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत जाईल.
• शनिवारी मध्यरात्री १२:१२ – सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवली जाईल.
• रविवारी रात्री ०२:३० – कर्जत-सीएसएमटी लोकल रात्री ०३:१० ला अंबरनाथहून सीएसएमटीसाठी सोडली जाईल.
• रविवारी पहाटे ०४:१० – कर्जत-सीएसएमटी विशेष लोकल चालवली जाणार आहे.
‘या’  मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
विशेषब्लॉकमुळे काही गाड्यांना कर्जत-दिवामार्गे वळवण्यात आले असून, काही गाड्या विलंबाने धावतील.
मार्ग बदललेल्या गाड्या:
    •    ११०२० – भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
    •    १८५१९ – विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
    •    १२७०२ – हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस
विलंबाने धावणाऱ्या गाड्या:
    •    २२१७८ – सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस
    •    ११०२२ – तिरुनेलवेली-दादर एक्सप्रेस

(हेही वाचा – Cabinet Design 2025: केंद्राकडून महाराष्ट्रातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गासह तीन मोठ्या प्रकल्पांना मंजूरी)

प्रवाशांना सूचना
विशेषब्लॉकच्या (Railway special block) काळात रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकावर विशेष थांब्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा उपयोग करता येईल. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना विशेषब्लॉक आणि गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांचा विचार करावा, असे आवाहन मध्यरेल्वे (Central Railway) प्रशासनाने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.