-
ऋजुता लुकतुके
शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्स फ्रँचाईजींना एक धक्का बसला. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही, हे सामन्यापूर्वी काही मिनिटं आधी स्पष्ट झालं. सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने एका वाक्यात याचं कारण सांगितलं, ‘रोहितच्या गुडघ्यावर चेंडू बसला आहे. त्यामुळे तो सामन्यात खेळू शकणार नाही.’ रोहितला झालेली दुखापत नेमकी किती गंभीर आहे हे समजू शकलेलं नाही. पण, फ्रँचाईजी आणि खुद्द रोहित शर्मा या दोघांसाठी ही बातमी फारशी चांगली नाही. (IPL 2025, MI vs LSG)
(हेही वाचा – Waqf विधेयकावरून Sharad Pawar यांच्या भूमिकेबाबत संभ्रम!)
रोहित शर्माचा फॉर्म सध्या खराब आहे आणि ३ सामन्यांत त्याने फक्त २१ धावा केल्या आहेत. त्यामुळे फॉर्ममध्ये परतण्याची आशा त्याला होती. दुसरीकडे, मुंबईच्या संघाला विजयाची आस आहे. कारण, आतापर्यंत संघाची कामगिरी संमिश्र आहे. त्यामुळे मुंबईलाही रोहितकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मुंबईचे ३ सामन्यांतून आतापर्यंत दोनच गुण झाले आहेत. आणि गुणतालिकेत मुंबईचा संघ सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. (IPL 2025, MI vs LSG)
(हेही वाचा – Vikhroli Bridge मे अखेरीस खुला करण्यासाठी जय्यत तयारी; शेवटचे गर्डर दाखल)
इतकंच नाही तर हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दलही भाष्य केलं. ‘बुमराह लवकरच मुंबई संघात दाखल होईल,’ असं हार्दिक म्हणाला. लखनऊ विरुद्ध रोहितची अनुपस्थिती संघासाठी एक मोठा धक्का आहे. कारण, हार्दिकने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचं आव्हान लखनौ संघाला दिल्यानंतर लखनौ संघाने २० षटकांत ८ बाद २०३ धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबई संघालाही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. इतकंच नाही तर रोहित नसल्यामुळे मुंबईच्या फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल करावा लागणार आहे. (IPL 2025, MI vs LSG)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community