China Increases Import Tariffs : चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकेवर लादला 34% कर ; शिवाय 16 अमेरिकन कंपन्यांना सेमीकंडक्टरची निर्यात करणे रोखले

China Increases Import Tariffs : चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकेवर लादला 34% कर ; शिवाय 16 अमेरिकन कंपन्यांना सेमीकंडक्टरची निर्यात करणे रोखले

48
US - China Trade War : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीला चीनचं प्रत्युत्तर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशा’ करांची घोषणा केल्यानंतर चीनने प्रत्युत्तर देत शुक्रवारी अमेरिकी वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क (China Increases Import Tariffs) लादले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला निर्यातीवरही जिनपिंग प्रशासनाने निर्बंध आहेत. जगातील सर्वांत दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये छेडले गेलेले हे व्यापारयुद्ध अधिक गडद होण्याची शक्यता वाढल्याने याचा फटका जगाच्या अर्थकारणाला बसण्याची भीती आहे. (China Increases Import Tariffs)

हेही वाचा-Vilas Ujwane : ‘चार दिवस सासूचे’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन

चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, नवीन आयात कर १० एप्रिलपासून लागू होईल. चीनची ही प्रत्युत्तरादाखलची कारवाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात करावरील प्रतिक्रिया आहे. चीन म्हणाले, कराच्या नावाखाली अमेरिका दादागिरी करत आहे. ते सहन केले जाणार नाही. (China Increases Import Tariffs)

हेही वाचा- Nanded Accident प्रकरणी पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी जाहीर केली दोन लाखांची मदत

ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशल वर पोस्ट केले की, चीनने अमेरिकेच्या करानंतर घबराटीतून हा कर जाहीर केला. चीनने कर लावून मोठी चूक केली आहे. अशा प्रकारचा आयात कर चीनला महागात पडेल. एका अन्य पोस्टमध्ये ते म्हणाले, करावरून धोरणात काहीही बदल केला जाणार नाही. अमेरिका आणखी श्रीमंत होणार आहे. त्यातच चीनने अमेरिकेच्या १६ कंपन्यांना सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफरवरदेखील स्थगिती दिली आहे. (China Increases Import Tariffs)

हेही वाचा- काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती

चीनकडून या कंपन्यांना सेमीकंडक्टर चिप, दुर्मिळ खनिज उदाहरणार्थ- लँथेनम, सेरियमची निर्यात होते. त्याचा वापर इलेक्ट्रिक कारपासून स्मार्ट बाॅम्ब बनवण्यापर्यंत होतो. अमेरिकेच्या या १६ कंपन्या खासगी व सरकारी क्षेत्रातील आहेत. त्या नागरी व लष्करी उपकरणे तयार करतात. चीनने अमेरिकन आयात कराच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटनेतही तीन नव्या याचिका दाखल केल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर महिनाभरात १० टक्के-१० टक्के कर लावला.चीनवर एकूण ५४ टक्के कर लावला आहे. (China Increases Import Tariffs)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.