US – China Trade War : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीला चीनचं प्रत्युत्तर

US - China Trade War : चीननेही अमेरिकन मालावर ३४ टक्के आयात शुल्क लावलं आहे.

77
US - China Trade War : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीला चीनचं प्रत्युत्तर
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला जाहीर केलेल्या आयात शुल्क वाढीत चीनवर सर्वाधिक ३४ टक्के शुल्क लादलं आहे. म्हणजेच चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर आता ३४ टक्के आयात शुल्क लागेल. अमेरिकन लोकांनी अमेरिकेत तयार होणाऱ्या मालाला प्राधान्य द्यावं यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. पण, त्यामुळे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात झालेल्या व्यापारी युद्धाचा दुसरा अध्याय आता पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण, ज्या देशांवर अमेरिकेनं शुल्कवाढ लादली, ते देशही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. पहिली तशी बातमी अर्थातच चीनमधून आली आहे. चीननं पलटवार करताना अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर ३४ टक्के इतकंच शुल्क लागू केलं आहे. (US – China Trade War)

इतकंच नाही तर १२ कंपन्यांना चीनने काळ्या यादीत टाकलं आहे. या कंपन्या व्यवहार करण्यासाठी विश्वसनीय नाहीत, असाच शिक्का त्यांच्यावर लावण्यात आला आहे. चीननं पलटवार केल्यानं अमेरिकन बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. डओ जोन्स इंडस्ट्रीयल ॲवरेज निर्देशांक १,२०० अंकांनी किंवा ३ टक्क्यांनी घसरला. एस अँड पी ५०० निर्देशांक साडेतीन टक्क्यांनी घसरला आहे. नासडॅकमध्येही ३.८ टक्क्यांची घसरण झाली. (US – China Trade War)

(हेही वाचा – World Health Day निमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’ उपक्रमांतर्गत सावरकर स्मारकात रक्त तपासणी शिबीर संपन्न; २०० जणांनी घेतला लाभ)

अमेरिकन शेअर बाजारासाठी गुरुवारचा दिवस २०२० नंतरचा सर्वात खराब दिवस ठरला. एस अँड पी ५०० निर्देशांक जवळ जवळ ५ टक्क्यांनी म्हणजेच ५,३९५ अंकांनी घसरुन बंद झाला. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली असल्याने जगातील ५०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची संपत्ती २०.८ हजार कोटी डॉलर्स म्हणजे १७.७३ लाख कोटींनी घटली. अमेरिका आणि जगभरातील शेअर बाजारांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे कारण चीनने अमेरिकेवर आयात शुल्क लादण्याचा घोषा केली आहे. पाठोपाठ कॅनडाही त्याच तयारीत आहे. (US – China Trade War)

अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी चीननं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या सात दुर्मिळ आणि हेवी मेटॅलिक एलिमेंटसच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टींचं उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया चीनमध्येच होते. त्यामुळे अमेरिकेला हा मोठा धक्का असणार आहे. प्रामुख्याने चीनच्या नव्या आयात शुल्क वाढीचा परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफच्या तुलनेत कमी असेल. कारण चीन अमेरिकेकडून वस्तू कमी खरेदी करतो. आणि अमेरिकेला जास्त प्रमाणात विक्री करतो. गेल्या वर्षी चीनने १४७.८ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली होती. यामध्ये अमेरिकेच्या सेमीकंडक्टर, जीवाश्म इंधन, कृषी उत्पादनं, इतर उत्पादनांचा त्यात समावेश होता. तर, अमेरिकेला ४२६.९ अब्ज डॉलर्सची विक्री केली होती. स्मार्ट फोन, फर्निचर, खेळणी यासह इतर गोष्टींची निर्यात केली होती. (US – China Trade War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.