
दरवर्षी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) मुंबईत दादर, विद्याविहार आणि कुर्ला या भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५९व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्त रविवार, ६ एप्रिल रोजी ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हनुमान सेवा मंडळ (Hanuman Seva Mandal) यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. या वेळी लोकमान्य रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ञांकडून गरजूंची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. (Blood Donation Thane)
( हेही वाचा : धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही; Raj Thackeray, Jitendra Awhad यांच्याविरोधात संत समितीच्या बैठकीत ठराव)
३८ बाटल्या रक्तसंकलन
सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान हे रक्तदान शिबीर हनुमान मंदिर (Hanuman Mandir), सावरकर नगर पोलीस चौकीसमोर, रोड क्रमांक २२, ठाणे पश्चिम येथे झाले. यात तीन महिलांनी रक्तदान करण्यासाठी नाव नोंदविले होते, त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यातील २ महिला रक्तदान करू शकल्या नाहीत. या शिबिरात ३८ बाटल्या रक्त संकलन झाले. रक्तदान शिबिराची सुरूवात सावरकर स्मारकाचे विश्वस्त कमलाकर गुरव यांच्या हस्ते करण्यात आली.
या शिबिरास सावरकर स्मारकाचे विश्वस्त कमलाकर गुरव (Kamlakar Gurav), व्यवस्थापक संजय चेंदवणकर आणि कर्मचारी जयश्री पोरे, सागर गावडे हे उपस्थित होते. हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष संदीप सकपाळ, कुणाल मोरे, सागर सकपाळ, निलेश चव्हाण आणि अजित बांदरे यांनी रक्तदान शिबिरास मोलाचे योगदान दिले. हे रक्तदान शिबिर स्मारकाच्या वतीने घेण्यात आलेले २५वे शिबिर आहे, तर हनुमान सेवा मंडळ आणि स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयोजनाचे हे ८ वे वर्ष आहे. (Blood Donation Thane)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community