Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा

151
Kalyan Dombivli परिसरातील ६५ बेकायदा इमारत (65 illegal buildings) प्रकरणात नव नवे घटना समोर येत आहेत. परिणामी या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुविशारद संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला (Kalyan Dombivli Municipal Corporation) रेरा घोटाळ्याप्रकरणी या ६५ इमारतींवर कारवाई करण्यासह आणखी पाच आदेश दिले होते. मात्र ३ महिने उलटूनही केडीएमसीने कोणत्याही सूचनेवर कारवाई केली नाही. (Kalyan Dombivli)

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवलीमधील बेकायदेशिर रित्या उभ्या करण्यात आलेल्या ६५ इमारतीमधील राहिवाशांनी या पाडकाम कारवाईला विरोध दर्शवला आहे.  विविध राजकीय पक्षांनी या इमारतींमधील रहिवाशांना बेघर करू नका अशी भूमिका मांडली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रीम कोर्टात स्थगितीसाठी जाण्याची घोषणा केली आहे.
मात्र, मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) यांच्या विधानानंतर याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅवेट दाखल केली आहे. या कॅवेटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात SLP (Special Leave Petition) दाखल केल्यास, संदीप पाटील यांची बाजू ऐकल्या शिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही.
 (हेही वाचा – West Bengal मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची पायाभरणी; १.५ एकर जमिनीवर होणार भव्य मंदिराची निर्मिती)

बनावट सातबारा तयार केल्याचं उघडकीस
तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली आयरे गावातील सर्व्हे नंबर 29/5 जमिनीचा सातबारा बनावट असल्याबाबत आणि बनावट सातबारा वापरून त्याठिकाणी जमिनीचा व्यवहार केल्याबाबत तक्रार कल्याण उपविभागीय कार्यालयात प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं मंडळ अधिकारी यांच्याकडून चौकशी केली असता सदर जमिनीच्या सातबारातील धरणा अधिकार बदललेला दिसून आला. तसंच, भोगवटा वर्ग दोन हा बदलून वर्ग एक बनवल्याचं निष्पन्न झाल्यानं डोंबिवलीतील मे साई डेव्हलपर्सतर्फे भागीदार शालिक आर भगत यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे कट कारस्थान करून बनावट सातबारा सादर करून डोंबिवली आयरे येथील सर्वे नंबर 29/5 अ क्षेत्र पंधरा-पन्नास या मिळकतीचं खरेदी खत करून बनावट सातबारा तयार केल्याचं उघडकीस आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजळ (Tehsildar Sachin Shejal) यांनी दिली.  

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.