सिंहस्थ कुंभमेळ्यातील सोईसुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा; धर्माचार्य Madhavdas Rathi Maharaj यांची मागणी

51
सिंहस्थ कुंभमेळ्यातील सोईसुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा; धर्माचार्य Madhavdas Rathi Maharaj यांची मागणी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील सोईसुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा; धर्माचार्य Madhavdas Rathi Maharaj यांची मागणी

नाशिकची गोदामाई केवळ कुंभमेळ्यापुरतीच नव्हे, तर कायमस्वरूपी स्वच्छ व प्रवाहित राहिली पाहिजे. कुंभमेळ्यात साधुग्राम, कुंभग्राम स्वतंत्र असून, दोन आयएएस दर्जाचे मेळा अधिकारी असावेत, कामांना उशीर झाल्यास घाईत कामे निकृष्ट होण्याची भीती असून, शेवटी तडजोड करावी लागते. त्यामुळे आतापासूनच सिंहस्थ कामे सुरू करावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य माधवदास राठी महाराज (Madhavdas Rathi Maharaj) यांनी केली.

( हेही वाचा : Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा

पंचवटीतील तपोवनात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात अखिल भारतीय संत समिती बैठकीत घेण्यात आले. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत हभप राठी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश अध्यक्ष गोपाल चैतन्यदास महाराज, महंत रामकिशोर शास्त्री, भक्तिचरणदास महाराज, महंत सुधीरदास पुजारी महाराज, महंत संतोषदास महाराज, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज (Swami Bharatananda Saraswati Maharaj), कोशाध्यक्ष श्यामचैतन्य महाराज उपस्थित होते.

हभप राठी महाराज (Madhavdas Rathi Maharaj) म्हणाले की, त्र्यंबकेश्वरप्रमाणेच नाशिकमध्ये कुंभमेळा नागरी समितीची बैठक घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्र्यंबकेश्वर अनौपचारिक भेट दिली, परंतु दोन्ही ठिकाणी बैठका घेऊन कामांना गती द्यावी. आदर्श सिंहस्थ कुंभमेळा म्हणून असलेली नाशिकची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रशासन, आखाडापरिषद, लोकप्रतिनिधी आणि जनतेनेदेखील सहकार्य करावे, असे आवाहनही राठी यांनी केले. यावेळी महंत भक्तिचरणदास महाराज आणि गोपाल चैतन्य महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी झालेल्या संत समितीत बैठकीत सिंहस्थ, महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे साधू-संत एकत्र आणण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय कार्यक्रम घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. अखिल भारतीय संत समितीचे कोकण प्रांत सहमंत्री शिवरूपानंद महाराज यांनी आभार मानले. यावेळी विविध आखाडा, पंथ, संप्रदायांचे साधू-संत व भाविक यावेळी उपस्थित होते. (Madhavdas Rathi Maharaj)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.