-
सुजित महामुलकर
गेल्या आठवड्यात वक्फ दुरुस्ती विधेयकावरून देशभरात वातावरण ढवळून निघाले. मात्र, या विधेयकाला समर्थन द्यायचे की विरोध करायचा, यावरून विरोधी पक्ष, विशेषत: राज्यातील शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP) संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे.
आकलनाच्या पलीकडले
एकीकडे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, असे जाहीरपणे सांगूनही, शिवसेना उबाठा बेंबीच्या देठापासून ओरडून त्यावरच येऊन थांबत आहे, हे आकलनाच्या पलीकडले आहे. लोकसभेत गेल्या बुधवारी २ एप्रिल या दिवशी वादळी चर्चा झाली आणि वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी ३ एप्रिल २०२५ या दिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांना नेमके काय म्हणायचे होते ते अद्याप समजू शकले नाही. (Waqf Amendment Bill)
(हेही वाचा – ‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल)
विरोध हा विधेयकाला नाही
भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेत मुस्लिम समाजाचे लांगूलचालन इतके केले की ते ऐकून मोहम्मद अली जिनांनाही लाज वाटेल, असा हल्लाबोल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. शिवसेना उबाठाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले पण ठाकरे पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हणाले, त्यांचा विरोध हा विधेयकाला नाही, तर भाजपच्या ढोंगीपणाला आहे. एकीकडे या विधेयकाचा आणि हिंदुत्व, हिंदू यांचा काही संबंध नाही असे सांगतानाच, हे विधेयक मुस्लिमहिताचे असल्याचा भाजपाचा दावा असेल तर त्यांनी हिंदुत्व का सोडले, असा सवालही त्यांनी केला. (Waqf Amendment Bill)
संभ्रमित प्रश्न
ठाकरे असंही म्हणतात की, वक्फसंदर्भातील काही सुधारणा चांगल्या असून, त्याबद्दल वाद नाही. मात्र भाजपाचा (BJP) खरा चेहरा या विधेयकामुळे देशाला कळला आहे. हिंदुत्वाबाबत भाजपाची धरसोड वृत्ती आता हिंदूंनाही समजली आहे. भाजपाचे सगळे नेते मुस्लिमांचे गुणगान गात आहेत. मुस्लिमांच्या हिताचे बिल आणले म्हणता, मग गरीब हिंदूंसाठी तुम्ही काय करणार, हिंदुत्व सोडले कोणी, असे काही संभ्रमित प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
(हेही वाचा – Jasprit Bumrah चे आयपीएलमध्ये होणार पुनरागमन !)
‘चक्रव्यूहा’त अडकले?
कदाचित उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मनातून विधेयकाला पाठिंबा द्यायचा असावा, मात्र काही अदृश्य दबावापोटी विरोध करावा लागला, असे त्यांच्या काही वक्तव्यांवरून दिसून येते किंवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत:भोवती जे सुरक्षा कवच निर्माण केले आहे, त्या ‘चक्रव्यूहा’त ते अडकून पडल्याची शंका निर्माण होते. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे काही मुद्दे मांडले ते जनतेपर्यंत पोहोचवण्यात कितपत यशस्वी, होतील याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत आपला विधेयकाला पाठिंबा असल्याचे सांगत, प्रक्रियेला विरोध आसल्याचे म्हटले आहे, यातून जनतेने काय संदेश घ्यायचा? (Waqf Amendment Bill)
राष्ट्रवादीबाबतही संशय?
शिवसेना उबाठाच नाही तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी पक्षही या विधेयकावरून संभ्रमित आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे, वक्फ दुरुस्ती विधेयकावरील मतदानादरम्यान शरद पवार राज्यसभेत गैरहजर होते. त्याचप्रमाणे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले त्यावेळी त्यांच्या पक्षाचे दोन खासदार, अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre), लोकसभेत अनुपस्थित होते. एका महत्त्वाच्या विधेयकाच्या मंजुरीदरम्यान शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या पक्षाचे खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत निश्चितच संशयाचे वातावरण निर्माण होण्यास वाव आहे.
(हेही वाचा – Love Jihad : आसिफ कुरेशीने ओळख लपवून केला पीडितेवर अत्याचार; आशिष असल्याचा केला बनाव)
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता ते म्हणाले पवार यांची तब्बेत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. तर शरद पवार यांचे लोकसभेतील दोन खासदारही गैरहजर होते, याबाबत छेडले असता राऊत चिडले आणि हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे, असे उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी (शप) खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) हे वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) सदस्य होते आणि ते बहुतांश बैठकांना हजर राहिले नाहीत. (Waqf Amendment Bill)
स्वतःचं हसं का करून घेता?
शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने स्वत:हून दिले असून त्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. सुरुवातीच्या काळात पत्रकारांनी पक्षाच्या नावाची सोय म्हणून संक्षिप्तपणे उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे केले. त्यावर एकदा उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना दम भरला. त्यानंतर बहुतांश पत्रकारांनी भीतीपोटी, गरजेपोटी किंवा आदरापोटी पर्यायी शिवसेना ठाकरे गट किंवा ठाकरेंची शिवसेना असं म्हणण्यास सुरुवात केली. मात्र आता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे संक्षिप्त रूप ‘एसंशि’ असे म्हणायला सुरुवात केली. अगोदर पत्रकारही बुचकळ्यात पडले. त्यांना त्याचा अर्थ कळेना. मग माहिती घेतली असता ‘एसंशि’चा अर्थ ‘एकनाथ संभाजी शिंदे’ असे कळले. वास्तविक, शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर दिला गेला. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना असून त्यांना ‘एसंशि’ असे संबोधून मानसिक समाधानापलीकडे काही मिळणार नाही, हे ठाकरे यांना कोणी सांगेल का? (Waqf Amendment Bill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community