वक्फ दुरुस्ती कायद्यावरून दि. ७ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्स वक्फ विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत आहे. तर तन्वीर सादिक वक्फ कायद्याविरुद्ध (Waqf Amendment Bill ) स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. (Waqf Amendment Bill)
( हेही वाचा : IPL 2025, Lucknow Super Giants : तेज गोलंदाज मयंक यादव दुखापतीतून पुनरागमन करण्याच्या तयारीत)
वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर हस्ताक्षर केले असून याचे कायद्यात रुपयांतर झाले आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम (Muslims) समुदाय याचे स्वागत करीत असतानाच मुस्लिम राजकारणी आणि इंडी आघाडीच्या (INDI Alliance) नेत्यांनी या कायद्याला विरोध सुरू केले आहे. मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत सोमवारी हा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न झाला. भाजपने प्रथम प्रश्नोत्तर सत्राची मागणी केली होती, तेव्हा नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी “वक्फ विधेयक (Waqf Amendment Bill) स्वीकार्य नाही, ते परत घ्या” इत्यादी घोषणा दिल्या. नॅशनल कॉन्फरन्सच्या (Jammu & Kashmir National Conference) आमदारांनी गोंधळ घातल्यानंतर विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभाध्यक्षांनी सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर चर्चा करता येणार नसल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. (Waqf Amendment Bill)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community