-
खास प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेस-शिवसेना उबाठा-राष्ट्रवादी काँग्रेस (शप) या महाविकास आघाडीत वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावर फूट पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Waqf)
काँग्रेसचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू केली होती, ज्यामध्ये भारतातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापन आणि देखरेखीवर त्याचा संभाव्य परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी ४ एप्रिल या दिवशी वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ ला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जावेद यांनी याचिकेत म्हटले की, हे विधेयक मुस्लिम समुदायाप्रती भेदभाव निर्माण करणारे आहे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. (Waqf)
उबाठाचा नकार
यासंदर्भात, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ठाकरे यांनी विधेयकाला विरोध असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी विधेयकाविरुद्ध न्यायालयात लढाई लढण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्या भूमिका वेगळ्या असून त्यांच्यात यावर एकमत नाही, हे स्पष्ट झाले. (Waqf)
(हेही वाचा – पेट्रोल आणि डिझेलवरील Excise Duty मध्ये २ रुपयांची वाढ; सर्वसामान्यांना महागाईचा फटका)
विधेयकाला विरोध नाही : ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे म्हणाले की, त्यांचा या विधेयकाला विरोध नाही. शिवसेना ऊबाठा पक्ष काँग्रेससोबत असला तरी या विधेयकाला ठाकरे यांनी मनापासून नाही, तर दबावाखाली विरोध केल्याचेही बोलले जात आहे. (Waqf)
जावेद हे वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ वरील संयुक्त संसदीय समितीचे सदस्य देखील होते. सोमवारी ७ एप्रिल २०२५ या दिवशी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि पक्षाचे नेते फयाज अहमद यांनी पक्षाच्या वतीने याचिका दाखल करणार आहेत. (Waqf)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community