-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘ॲक्वा’ जलआकार प्रणालीच्या सर्व्हरवरील माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थानांतरित करण्याचे कामकाज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जल अभियंता विभागाची ‘ॲक्वा’ ही जलआकार देयके व संकलन प्रणाली तसेच तिच्यावर आधारित इतर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. (BMC)
(हेही वाचा – दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती)
मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रातील जलआकार भरणा, ऑनलाईन जलआकार भरणा तसेच ‘ॲक्वा’ प्रणालीशी संबंधित सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच महानगरपालिका संकेतस्थळावरील जलआकार संबंधित कोणतीही माहिती या कालावधीत उपलब्ध नसेल. (BMC)
(हेही वाचा – बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा; Adv. Ashish Shelar यांचे निर्देश)
सध्या अस्तित्वात असलेल्या ‘ॲक्वा’ प्रणालीच्या परिरक्षण व सुधारणेकरिता कामकाज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त नमूद कालावधीत ‘ॲक्वा’ जलआकार देयक व संकलन प्रणाली संपूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community