IPL 2025, MI vs RCB : जसप्रीत बुमराह आणि विराट जेव्हा मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकतात

विराटने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार वसूल केला.

69
IPL 2025, MI vs RCB : जसप्रीत बुमराह आणि विराट जेव्हा मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकतात
IPL 2025, MI vs RCB : जसप्रीत बुमराह आणि विराट जेव्हा मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकतात
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स (MI vs RCB) हे एक प्रकारे पारंपरिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्याला कराण आहे रोहित शर्मा (Rohit Sharma) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) हा रंगणारा मुकाबला. आणि जोडीला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि विराट यांच्यातील द्वंद्व. यावेळी या द्वंद्वांत अंशत: विराट कोहलीने (Virat Kohli) बाजी मारली. त्याने ४२ चेंडूंत ६७ धावा केल्या. त्याने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकारही वसूल केला. भारतीय संघात गेली ७ वर्षं एकत्र खेळणारे हे खेळाडू दोन चेंडूंच्या मध्ये मात्र एकमेकांशी हास्यविनोद करताना दिसले. यातील अकराव्या षटकातील एक प्रसंग काहीसा मजेशीर होता.

रजत पाटीदारने (Rajat Patidar) चेंडूचा मुकाबला केला. त्याने हा चेंडू तटवला. तो थेट गोलंदाज बुमराहकडे गेला. बुमराहने झपकन चेंडू अडवला. आणि दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या विराटकडे फेकण्याचं नाटक केलं. कोहलीच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. मग दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. काही क्षण दोघांमध्ये हास्यविनोद रंगले. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. (IPL 2025, MI vs RCB)

(हेही वाचा – Weather Update : ऐन लग्नसराईत उन्हाचा पारा वाढला; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? वाचा )

विराट कोहली (Virat Kohli) आज चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने बंगळुरू डावाची सुरुवात सकारात्मक केली. आणि बुमराहचं स्वागतही षटकार मारुन केलं. बुमराह या सामन्यातून ३ महिन्यांनंतर स्पर्धात्मक पुनरागमन करत होता. पण, विराटने त्याच्या पहिल्या षटकांत १२ धावा वसूल केल्या. पण, दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला आदरही मैदानात दिसत होता. षटकांच्या मध्ये दोघं एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. विराटने या सामन्यात २९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आणि त्याबरोबरच टी-२० प्रकारात आपल्या १३,००० धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. (IPL 2025, MI vs RCB)

विराट (Virat Kohli) आणि कर्णधार रजत पाटिदारच्या (Rajat Patidar) अर्धशतकांमुळे बंगळुरू संघाने मुंबईविरुद्ध (MI vs RCB) ५ बाद २२१ धावा केल्या. शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) फक्त ५ धावा दिल्या. बुमराहच्या ४ षटकांत २९ धावा निघाल्या. (IPL 2025, MI vs RCB)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.